फोटो सौजन्य: व्हिडीओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी असे आश्चर्यचकित करणारे व्हिडीओ पाहायला मिळतात की त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. तर कधी असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे पाहून हसू आवरत नाही. सध्या असाच एक आश्चर्यचकित करणारा व्हिडीओ पाहायला मिळत आहे. जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शक्यता लोक पार्किंगमध्ये सायकल, कार, किंवा दुचाकी पार्क करतात. पण एक मुलगा खेळण्यातील कार घेऊन खऱ्या कार पार्किंगमध्ये पोहोचला. त्यानंतर त्याने गार्डला असे काही विचारले की, ते देखील आश्चर्यचकित झाले.
रिमोट टॉय कार पार्क करायला गेला अन्
हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर आर्यन कटारिया (@katariaaryann)याने नुकताच पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो पार्किंग एरियात उभ्या असलेल्या गार्डसोबत चेष्टा करताना दिसत आहे. आर्यनने त्याच्यासोबत रिमोट कंट्रोल टॉय कार घेतली आहे. तो पार्किंग एरियात जातो आणि गार्डला विचारतो की त्याने त्याची गाडी कुठे पार्क करायची. गार्ड आश्चर्यचकित होतात आणि विचारतात की त्याच्याकडे गाडी कुठे आहे? मग आर्यन त्यांना खाली जमिनीवर रिमोट चालवणारी कार दाखवतो.
तो असे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन करतो. आणि गार्डला गाडी कुठे पार्क करू असे विचारतो. गाडी पाहून सगळे आश्चर्यचकित होतात आणि हसायला लागतात. एखादे वाहन येऊन त्यावर चढले तर ते तुटेल असे सगळे सुरक्षारक्षक सांगतात. तर आर्यन म्हणतो की त्याने पार्किंगसाठी पैसे भरले आहेत, त्यामुळे तो त्याच्या खेळण्यातील कारही तिथे पार्क करू शकतो. 50 रुपयेही प्रामाणिकपणे भरल्याचे ते सांगतात. जेव्हा एक माणूस त्याची कार पाहून हसायला लागतो तेव्हा आर्यन त्याला विचारतो की तो त्याच्या कारकडे का हसतोय?
हे देखील वाचा – वंदे भारत ट्रेन चालवण्यावरून लोको पायलटमध्ये वाद, व्हिडिओ व्हायरल… पाहून लोक हैराण
व्हायरल व्हिडीओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
या व्हिडिओला आत्तापर्यंत 2 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरए म्हटले आहे की, ‘या माणसाला कोणी तर ऑवर्ड देते का? तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, ‘की शेवटच्या काकांनी गाडी पार्क करायला जागा दिली. किती चांगले आहेत ते.’ आणखी एकाने म्हटले आहे की, जर कोणी पार्किंगमधून कार बाहेर काढायला गेला तर त्याला ती कार दिसणार पण नाही तिचा चुरा होऊन जाईल.’ आणकी एकाने आर्यनला म्हणले आहे की, तुम्ही सगळ्यांची खूप चेष्टा करता, कोणीतरी तुम्हाला उचलून घेऊन जाईल कधीतरी!