Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय क्षेपणास्त्रांची ताकद वाढली! DRDO कडून ‘SFDR’ तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी; शत्रूचा थरकाप उडणार

तंत्रज्ञानाच्या यशामुळे आता भारत लांब पल्ल्याची 'हवेतल्या हवेत' मारा करणारी अत्याधुनिक क्षेपणास्त्रे विकसित करण्यास पूर्णपणे सज्ज झाला असून, यामुळे युद्धाच्या मैदानात भारतीय लष्कराला रणनीतिक आघाडी मिळणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 03, 2026 | 08:54 PM
भारतीय क्षेपणास्त्रांची ताकद वाढली! DRDO कडून 'SFDR' तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी (Photo Credit- X)

भारतीय क्षेपणास्त्रांची ताकद वाढली! DRDO कडून 'SFDR' तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • भारतीय क्षेपणास्त्रांची ताकद वाढली!
  • DRDO कडून ‘SFDR’ तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी
  • शत्रूचा थरकाप उडणार
भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) संरक्षण क्षेत्रात आज एक मोठी ऐतिहासिक झेप घेतली आहे. ओडिसाच्या किनारपट्टीवर असलेल्या चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रातून (ITR) ‘सॉलिड फ्युएल डक्टेड रॅमजेट’ (SFDR) तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी करण्यात आली. या तंत्रज्ञानाच्या यशामुळे आता भारत लांब पल्ल्याची ‘हवेतल्या हवेत’ मारा करणारी (Air-to-Air) अत्याधुनिक क्षेपणास्त्रे विकसित करण्यास पूर्णपणे सज्ज झाला असून, यामुळे युद्धाच्या मैदानात भारतीय लष्कराला रणनीतिक आघाडी मिळणार आहे.

प्रगत देशांच्या रांगेत भारताचे स्थान

या यशस्वी चाचणीसह भारत आता जगातील त्या मोजक्याच देशांच्या यादीत सामील झाला आहे ज्यांच्याकडे हे अत्यंत प्रगत रॅमजेट तंत्रज्ञान उपलब्ध आहे. डीआरडीओने दिलेल्या माहितीनुसार, ही महत्त्वपूर्ण चाचणी मंगळवारी सकाळी १०.४५ वाजता पार पडली. चाचणी दरम्यान मिसाईलमधील सर्व यंत्रणांनी, विशेषतः सॉलिड फ्युएल डक्टेड रॅमजेट मोटर आणि फ्युएल फ्लो कंट्रोल सिस्टमने अपेक्षेप्रमाणे अचूक काम केले.

Solid Fuel Ducted Ramjet (SFDR) technology was successfully flight tested from the Integrated Test Range (ITR), Chandipur off the coast of Odisha today. SFDR is very crucial for development of long range Air to Air Missiles pic.twitter.com/66ZwE0micY — DRDO (@DRDO_India) February 3, 2026

“भारत सोडून जा, नाहीतर…”; सर्वोच्च न्यायालयाने WhatsApp ला फटकारले; जाणून घ्या काय आहे प्रकरण

अशी पार पडली चाचणी

बूस्टरचा वापर: मिसाईलला सुरुवातीला जमिनीवरून एका बूस्टरच्या सहाय्याने प्रचंड वेग देण्यात आला.

अचूक नियंत्रण: उड्डाणादरम्यान क्षेपणास्त्राच्या प्रत्येक हालचालीवर बंगालच्या उपसागराच्या किनारी तैनात असलेल्या रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टमद्वारे बारीक लक्ष ठेवण्यात आले होते.

स्वदेशी बनावट: यामध्ये वापरलेला विना-नोझल बूस्टर आणि रॅमजेट इंजिन पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे आहे, ज्याचे उड्डाण यशस्वी झाल्याची पुष्टी शास्त्रज्ञांनी केली आहे.

हायपरसोनिक क्षेत्रातही भारताची ऐतिहासिक कामगिरी

याच महिन्यात भारताने हायपरसोनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही मोठे यश संपादन केले आहे. हैद्राबाद येथील DRDL प्रयोगशाळेने स्कॅमजेट इंजिनची यशस्वी चाचणी केली होती, ज्यामध्ये हे इंजिन १२ मिनिटांहून अधिक काळ स्थिरपणे चालले. हायपरसोनिक क्षेपणास्त्रे आवाजाच्या वेगापेक्षा ५ पटीने अधिक, म्हणजेच साधारण ६,१०० किमी प्रति तास वेगाने लांब अंतरापर्यंत उड्डाण करण्यास सक्षम असतात.

संरक्षण मंत्र्यांकडून शास्त्रज्ञांचे कौतुक

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल डीआरडीओ आणि या प्रकल्पाशी संबंधित उद्योगांचे अभिनंदन केले. डीआरडीओ प्रमुख डॉ. समीर व्ही. कामत यांनीही संपूर्ण टीमचे कौतुक करताना म्हटले की, “हा विजय भारताच्या संरक्षण तंत्रज्ञानाला स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल आहे.”

एअर इंडियाच्या इंधन स्विचमध्ये पुन्हा बिघाड; ‘बोईंग 787 ड्रीमलाइनर’च्या उड्डाणात अडथळा

Web Title: Drdo successfully tests sfdr technology it will strike fear into the enemy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 08:54 PM

Topics:  

  • DRDO
  • india
  • odisa

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन
2

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
3

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.