
पुण्यातील तीन संस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान
‘प्रलय’ हे घन इंधनावर चालणारे स्वदेशी क्षेपणास्त्र असून, त्यामध्ये आधुनिक मार्गदर्शन आणि दिशादर्शन प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे लक्ष्याचा अचूक वेध घेणे शक्य होते. विविध प्रकारच्या लक्ष्यांवर मारा करण्यासाठी या क्षेपणास्त्रात वेगवेगळ्या प्रकारची पारंपरिक स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे. भारतीय लष्कर आणि हवाई दलात त्याचा समावेश करण्याचे नियोजन आहे.
DRDO Recruitment 2026: संरक्षण संशोधन संस्थेत २४ जागांसाठी भरती; असा करा अर्ज
या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी डिसेंबर २०२१ मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर विविध संरचनांमध्ये त्याच्या चाचण्या करण्यात आल्या. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सलग दोन क्षेपणास्त्रे डागण्याची (सॅल्व्हो लॉन्च) चाचणीही यशस्वी झाली होती. सध्याच्या वापरकर्ता मूल्यमापन चाचण्या पूर्ण झाल्यानंतर हे क्षेपणास्त्र लष्करात समाविष्ट करण्यासाठी सज्ज होणार आहे.
या क्षेपणास्त्राच्या विकासात हैदराबाद येथील रिसर्च सेंटर इमारत या प्रमुख संस्थेसह पुण्यातील आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (एआरडीई), हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरेटरी (एचईएमआरएल) आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (इंजिनिअर्स) या तीन संस्थांनी योगदान दिले आहे. याशिवाय डीआरडीओच्या इतर संशोधन संस्थांचाही या प्रकल्पात सहभाग आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, चाचणीदरम्यान सर्व निर्धारित उद्दिष्टे यशस्वीपणे पूर्ण झाली. चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्राने (आयटीआर) तैनात केलेल्या विविध उपकरणांमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे याला दुजोरा मिळाला. भारत डायनॅमिक्स लिमिटेड या विकास आणि उत्पादन भागीदार कंपनीने या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओ, संरक्षण दल आणि उद्योग क्षेत्रातील भागीदारांचे अभिनंदन केले. प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या क्षेपणास्त्रामुळे लष्कराची तांत्रिक क्षमता आणि बदलत्या धोक्यांचा सामना करण्याची सज्जता अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संरक्षण सचिव तथा डीआरडीओचे अध्यक्ष राजेश कुमार सिंह यांनीही चाचणीत सहभागी झालेल्या सर्व पथकांचे अभिनंदन केले.
Ans: डीआरडीओने प्रलय मिसाईलची यशस्वी चाचणी घेतली.
Ans: प्रलय मिसाईलची पहिली चाचणी डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात आली होती.