Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून 4.98 लाखांची फसवणूक; ‘ती’ लिंक पाठवली अन्…

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे सांगून ज्येष्ठ नागरिकाची ८ लाख ५७ हजार २७३ रुपयांची फसवणूक करण्यात आली. व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेऊन पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 06, 2026 | 12:23 PM
शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून 4.98 लाखांची फसवणूक; 'ती' लिंक पाठवली अन्...

शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून 4.98 लाखांची फसवणूक; 'ती' लिंक पाठवली अन्...

Follow Us
Follow Us:
  • शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने पुण्यात ऑनलाइन फसवणुकीची दोन प्रकरणे
  • पहिल्या प्रकरणात ४.९८ लाखांची फसवणूक
  • व्हॉट्सअॅपवरून संपर्क साधून ट्रेडिंग खाते उघडण्याची लिंक
पुणे : शेअर ट्रेडिंगमधून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाची ४ लाख ९८ हजार १८ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपवर संपर्क साधून ट्रेडिंग खाते उघडण्यासाठी लिंक पाठवली होती. नंतर बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर करून फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात मोबाईल क्रमांकधारक आणि बँक खातेधारकांविरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समीर कमरुद्दीन तांबोळी (वय ५८, लोहियानगर, गंज पेठ, खडक) यांनी तक्रार दिली आहे. २४ जून २०२५ ते २६ सप्टेंबर २०२५ दरम्यान हा प्रकार घडला. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी व्हॉट्सअॅपवरून संपर्क करून शेअर ट्रेडिंगसाठी खाते तयार करण्यास सांगितले. लिंकवरून खाते उघडल्यानंतर फिर्यादीची आर्थिक फसवणूक झाली. खडक पोलिस तपास करत आहेत. तसेच शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे सांगून ज्येष्ठ नागरिकाची ८ लाख ५७ हजार २७३ रुपयांची फसवणूक करण्यात आली. व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेऊन पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अज्ञात मोबाईल क्रमांकधारक आणि बँक खातेधारकांविरोधात विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मारुती आत्माराम सरक (वय ३९, भिमनगर, विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. दि. १७ मे २०२५ ते दि. १९ जून २०२६ दरम्यान आरोपींनी संपर्क साधला. ‘जयराम ब्रोकिंग’च्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी केले आणि रक्कम गुंतवण्यास सांगितले. विश्रांतवाडी पोलिस तपास करीत आहेत.

इन्स्टाग्रामवरील बनावट अॅपद्वारे 3.90 लाखांची फसवणूक

इन्स्टाग्रामवरील रील पाहण्यासाठी अॅप डाऊनलोड करण्यास सांगून वाघोळीतील व्यक्तीची ३ लाख ९० हजार ५०८ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. अॅपला मोबाईलचा प्रवेश मिळाल्यानंतर बँक खात्यातील रक्कम आणि क्रेडिट कार्डचा गैरवापर केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारक व अॅपधारकांवर वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मजहरखान युसुफखान पठाण (वय ३५, रा. मॅगमन आयरिस सोसायटी, राधास्वामी आश्रमजवळ, केसनंद गाव, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे.

FAQ

1. शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली किती रुपयांची फसवणूक झाली?
पहिल्या प्रकरणात ४ लाख ९८ हजार १८ रुपये, तर दुसऱ्या प्रकरणात ८ लाख ५७ हजार २७३ रुपयांची फसवणूक झाली.

2. पहिल्या फसवणुकीत आरोपींनी कसा संपर्क साधला?
आरोपींनी व्हॉट्सअॅपवरून संपर्क साधून शेअर ट्रेडिंग खाते उघडण्यासाठी लिंक पाठवली.

3. पहिल्या प्रकरणात कोणत्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला?
या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात अज्ञात मोबाईल क्रमांकधारक आणि बँक खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Rs 498 lakh swindled under the pretext of share trading nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • Cyber Fraud
  • Online scam
  • pune news

संबंधित बातम्या

Diwali 2026: फ्लॅट संस्कृतीत रांगोळीचा नवा ट्रेंड; वुडन, वुलन आणि मॅट रांगोळीला वाढती मागणी
1

Diwali 2026: फ्लॅट संस्कृतीत रांगोळीचा नवा ट्रेंड; वुडन, वुलन आणि मॅट रांगोळीला वाढती मागणी

Pune Water News: पुण्याचा पाणीप्रश्न CM फडणवीसांच्या कोर्टात; स्वतंत्रपणे 13 टीएमसी…, काय आहे मागणी?
2

Pune Water News: पुण्याचा पाणीप्रश्न CM फडणवीसांच्या कोर्टात; स्वतंत्रपणे 13 टीएमसी…, काय आहे मागणी?

पुण्याच्या ARAPL ची अमेरिकेत मोठी झेप; जगातील पहिल्या १३ रोबोटिक्स कंपन्यांमध्ये स्थान
3

पुण्याच्या ARAPL ची अमेरिकेत मोठी झेप; जगातील पहिल्या १३ रोबोटिक्स कंपन्यांमध्ये स्थान

आढावा बैठकीला गैरहजर, कामकाजही प्रलंबित; दोन सह दुय्यम निबंधकांना कारणे दाखवा नोटीस
4

आढावा बैठकीला गैरहजर, कामकाजही प्रलंबित; दोन सह दुय्यम निबंधकांना कारणे दाखवा नोटीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.