Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आपचे खासदार संजय सिंह यांना पाच दिवसांची ईडी कोठडी; 10 ऑक्टोबरला होणार पुढील सुनावणी

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात आपचे खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ईडीच्या या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले. रात्रभर ईडीच्या मुख्यालयात (ED Office) ठेवल्यानंतर त्यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 06, 2023 | 10:00 AM
आपचे खासदार संजय सिंह यांना पाच दिवसांची ईडी कोठडी; 10 ऑक्टोबरला होणार पुढील सुनावणी
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात आपचे खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ईडीच्या या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले. रात्रभर ईडीच्या मुख्यालयात (ED Office) ठेवल्यानंतर त्यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने संजय सिंह यांना पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला होणार आहे.

ईडी अधिकाऱ्यांनी संजय सिंह यांची तब्बल 10 तास कसून चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक केली. या कारवाईची माहिती मिळताच आपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तेथे जमा झाले होते. त्यानंतर निमलष्करी दलाच्या जवानांची संख्याही वाढविण्यात आली. संजय सिंह यांना मागच्या दाराने बाहेर काढून ईडी मुख्यालयात आणण्यात आले. संजय सिंह यांच्याविरोधात सबळ पुरावे असताना त्यांना अटक करण्यासाठी एवढा वेळ का लागला? तसेच तुम्ही (ईडी) ज्या पैशांच्या व्यवहाराबाबत बोलत आहात, ते जुने प्रकरण आहे, मग अटकेला एवढा विलंब का? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.

कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात 

संजय सिंह यांच्या अटकेविरोधात मध्य दिल्लीत निदर्शने करणाऱ्या शेकडो आप कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. डीडीयू मार्गावर असलेल्या आम आदमी पार्टीच्या कार्यालयात पक्षाचे अनेक कार्यकर्ते जमले. त्यांनी केंद्राच्या विरोधात घोषणाबाजी करत सिंग यांच्या सुटकेची मागणी केली.

हे लोक खोटे गुन्हे दाखल करताहेत : केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, हे लोक सर्व खोट्या केसेस दाखल करत आहेत. त्यांनी इतके गुन्हे दाखल केले, खूप तपास केला पण काहीही निष्पन्न होत नाही. या तपासाच्या खेळात प्रत्येकाचा वेळ वाया जात आहे.

Web Title: Ed custody of aap mp sanjay singh for five days the court reprimanded the ed nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2023 | 10:00 AM

Topics:  

  • AAP
  • Arvind kejriwal
  • political news
  • Sanjay Singh

संबंधित बातम्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
1

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
2

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

Arvind Kejriwal PC: निवडणूक आयोगात १३ कोटी मतांची हेराफेरी? अरविंद केजरीवाल यांची ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
3

Arvind Kejriwal PC: निवडणूक आयोगात १३ कोटी मतांची हेराफेरी? अरविंद केजरीवाल यांची ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद
4

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.