Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हरियाणासह जम्मू-कश्मीर विधानसभेचा बिगूल वाजणार; निवडणूक आयोग करणार घोषणा

019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर, जम्मू-काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश  म्हणून मान्यता देण्यात आली. तेव्हापासून तेथील राजकीय पक्षांकडून राज्याचा दर्जा परत करण्याची मागणी सातत्याने होत होती. आधी निवडणुका होतील आणि मगच राज्याचा दर्जा बहाल केला जाईल,  असे सरकारकडून वारंवार सांगितले जात होते.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 16, 2024 | 09:33 AM
हरियाणासह जम्मू-कश्मीर विधानसभेचा बिगूल वाजणार; निवडणूक आयोग करणार घोषणा
Follow Us
Follow Us:

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर गेल्या पाच वर्षांत या ठिकाणी कोणत्याही निवडणुका झाल्या नाहीत. अशातच आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हरियाणा आणि  जम्मू-काश्मीरच्या विधानसभा  निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखाही आज जाहीर होऊ शकतात. जम्मू-काश्मीरमधून 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होणार आहेत. आयोगाने गेल्या आठवड्यातच जम्मू-काश्मीर आणि हरियाणाचा दौरा पूर्ण केला होता.

हरियाणाबद्दल विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. सध्या तीन जागा रिक्त आहेत. भाजपचे 41 आमदार आहेत. काँग्रेसकडे 29, जेजेपीकडे 10 आणि आयएनएलडी आणि एचएलपीकडे प्रत्येकी एक आमदार आहे. सभागृहात पाच अपक्ष आमदार आहेत.

हेदेखील वाचा: महाविकास आघाडीचा मेळावा; उद्धव ठाकरेंना मिळणार मोठी जबाबदारी?

दरम्यान,  2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर, जम्मू-काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश  म्हणून मान्यता देण्यात आली. तेव्हापासून तेथील राजकीय पक्षांकडून राज्याचा दर्जा परत करण्याची मागणी सातत्याने होत होती. आधी निवडणुका होतील आणि मगच राज्याचा दर्जा बहाल केला जाईल,  असे सरकारकडून वारंवार सांगितले जात होते.

जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक झाल्यास तीन ते चार टप्प्यांत मतदान होऊ शकते. सप्टेंबरमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या महिन्याच्या अखेरीस निवडणुकीचा निकाल जाहीर होऊ शकतो. निवडणूक आयोगाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात निवडणुका घेण्याच्या मार्गातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे सुरक्षा व्यवस्था. अलीकडच्या काळात अचानक वाढलेल्या दहशतवादी घटनांमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्याचा परिणाम निवडणूक कार्यक्रमावरही दिसून येऊ शकतो.

हेदेखील वाचा : 2024 मध्ये भारतातील सर्वात धोक्यात असलेल्या प्रजाती कोणत्या? जाणून घ्या 

परिसीमनानंतर प्रथमच निवडणूक

परिसीमनाचे काम पूर्ण न झाल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये दीर्घकाळ विधानसभा निवडणुका होऊ शकल्या नाहीत. मे 2022 च्या परिसीमनानंतर जम्मू-काश्मीर विधानसभेच्या जागांची संख्या आता 90 झाली आहे. अशा प्रकारे जम्मूमधील 43 विधानसभा जागांवर आणि काश्मीरमधील 47 विधानसभा जागांवर निवडणूक होणार आहे. 2014 मध्ये, लडाखमधील 6 जागांसह जम्मूमधील 37 जागा आणि काश्मीर खोऱ्यातील 46 जागांसह 87 विधानसभा जागांवर निवडणुका झाल्या.

Web Title: Election commission haryana and jammu and kashmir assembly elections latest news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2024 | 09:24 AM

Topics:  

  • election commission of india
  • Haryana
  • Jammu and Kashmir

संबंधित बातम्या

संतापजनक! पोलिस ठाण्यात कॅन्सरग्रस्त रुग्णावर लैंगिक अत्यचार, हरियाणातील पोलिसांचे कुकर्म उघड
1

संतापजनक! पोलिस ठाण्यात कॅन्सरग्रस्त रुग्णावर लैंगिक अत्यचार, हरियाणातील पोलिसांचे कुकर्म उघड

PoK Burning: पाकव्याप्त काश्मीरमध्ये 70 हजार आंदोलक रस्त्यावर; 20 हजार सैनिकांचा वेढा, अन्न आणि इंटरनेटही केले बंद
2

PoK Burning: पाकव्याप्त काश्मीरमध्ये 70 हजार आंदोलक रस्त्यावर; 20 हजार सैनिकांचा वेढा, अन्न आणि इंटरनेटही केले बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.