Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kulgam Terror Attack: कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला; तीन जवान गंभीर जखमी, लश्कर कमांडर लतीफ भटचा हात असल्याचा संशय

३१ जुलै रोजी कुलगाममध्ये छत्तीसगडमधील दोन स्थलांतरित मजुरांच्या हत्येमध्येही लतीफचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. लतीफ भट हा कश्मीर खोऱ्यातील  सक्रिय  दहशतवादी असून त्याच्या अटकेसाठी कश्मीमध्ये १५ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 12, 2026 | 02:20 PM
Kulgam Terror Attack J&K, CRPF Post Firing Kulgam, AK47 Attack Jammu Kashmir,

Kulgam Terror Attack J&K, CRPF Post Firing Kulgam, AK47 Attack Jammu Kashmir,

Follow Us
Follow Us:
  • कुलगाम जिल्ह्यात अचानक दहशतवादी हल्ला
  • तीन जवान जखमी
  • परिसरात हाय अलर्ट व शोधमोहीम
 

Kulgam Terror Attack Update: जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दलदलीच्या भागातून जात असताना, हल्लेखोरांनी अखरान कॅम्पमधील चेकपॉईंटवर तैनात असलेल्या सीआरपीएफ जवानांवर एके-४७ रायफलने गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. अंधाधुंद गोळीबारानंतर हल्लेखोर  दाट झाडाझुडपांमधून पळून गेले. या हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल सोमवीर, कॉन्स्टेबल संतानो आणि राकेश दास गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दोन विशेष पोलीस अधिकारी शहीद

या दहशतवाद्यांचा संबंध लश्कर कमांडर लतीफ भट याच्याशी असल्याची शंकाही व्यक्त केली जात आहे. या शिवाय दोन परदेशी दहशतवादी असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. संपूर्ण परिसरात मोठी शोधमोहीम सुरू आहे. या घटनेदरम्यान बेपत्ता झालेल्या दोन विशेष पोलीस अधिकाऱ्यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी सापडले. दोन्ही जवानांच्या मृतदेहांवर गोळ्यांच्या जखमा आढळून आल्या.

NCP Merger News: अजित पवार महायुतीची साथ सोडणार होते; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

दोन्ही विशेष पोलीस अधिकाऱ्यांची हत्या दहशतवाद्यांनी केली असल्याचा संशय आहे. सैनिकांनी बाळगलेली अधिकृत शस्त्रेही गायब झाली आहेत. दक्षिण काश्मीरमध्ये सर्वत्र सैनिक तैनात असून ते सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही करत आहेत. याचा उपयोग हल्लेखोरांना ओळखण्यासाठी आणि त्यांच्या पळून जाण्याच्या मार्गाचा माग काढण्यासाठी केला जात आहे.

दहशतवाद्यांनी कोणत्या धोकादायक गोळ्या वापरल्या?

मिळालेल्या वृत्तानुसार, कुलगाममध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी विशेष धातूचे आवरण असलेल्या, बुलेटप्रुफ जॅकेट भेदणाऱ्या (AP) गोळ्या वापरल्या. यापैकी काही गोळ्या एका सीआरपीएफ जवानाच्या बुलेटप्रूफ जॅकेटमधून आरपार गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. जखमी जवानावर सध्या श्रीनगरमधील लष्कराच्या ९२ बेस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Kalyan Politics: 11 महिने उलटले, स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा पत्ता नाही! कल्याण-डोंबिवली

लतीफ भट यांच्यावर खळबळजनक आरोप

या हल्ल्यात लश्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद लतीफ भट याचा सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. आहे. पोलीस हल्ल्याच्या सर्व पैलूंचा तपास करत आहेत. २२ जुलै, २०२६ रोजी अनंतनागमध्ये हेड कॉन्स्टेबल आशिक हुसेन कुरेशी यांच्या हत्येचा आरोपही लतीफ भटवर करण्यात आला आहे.

३१ जुलै रोजी कुलगाममध्ये छत्तीसगडमधील दोन स्थलांतरित मजुरांच्या हत्येमध्येही लतीफचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. लतीफ भट हा कश्मीर खोऱ्यातील  सक्रिय  दहशतवादी असून त्याच्या अटकेसाठी कश्मीमध्ये १५ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.

ओजीडब्ल्यूंची चौकशी सुरूच

जम्मू आणि काश्मीरमधील तपास यंत्रणा लश्कर-ए-तोयबाचे (LeT) ‘ओव्हरग्राउंड वर्कर्स’ (OGWs) असल्याचा संशय असलेल्या तीन जणांची चौकशी  केली जात आहे. हल्ल्यापूर्वी या स्थानिक साथीदारांनी टेहळणी करणे, आश्रय देणे किंवा दहशतवाद्यांना रसद पुरवण्यात कोणती भूमिका बजावली होती का, हे ते निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

एक नवीन ‘स्लीपर’ दहशतवादी गट सक्रिय झाला आहे का, आणि हे दहशतवादी पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधून (PoK) घुसले आहेत का, या शक्यतेचाही अधिकारी तपास करत आहेत. सीआरपीएफच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईमुळे हल्लेखोरांचे मनसुबे उधळले गेले.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: कुलगाम हल्ल्यानंतर समोर आलेल्या नवीन अपडेटमध्ये कोण मृत आढळले आहे?

    Ans: हल्ल्यानंतर बेपत्ता झालेल्या दोन विशेष पोलीस अधिकाऱ्यांचे (SPO) मृतदेह गुरुवारी सकाळी गोळ्यांच्या जखमांसह आढळून आले आहेत.

  • Que: या दहशतवादी हल्ल्यामागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा किंवा कमांडरचा हात असल्याचा संशय आहे?

    Ans: या हल्ल्यामागे लश्कर कमांडर लतीफ भट आणि दोन परदेशी दहशतवाद्यांचा संबंध असण्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

  • Que: सध्या कुलगाम परिसरात सुरक्षा यंत्रणांकडून काय कारवाई सुरू आहे?

    Ans: संपूर्ण दक्षिण काश्मीरमध्ये हाय अलर्ट असून, हल्लेखोरांना पकडण्यासाठी आणि त्यांच्या पळून जाण्याच्या मार्गाचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही तपासणीसह व्यापक शोधमोहीम राबवली जात आहे.

Web Title: Kulgam terror attack 3 crpf jawans injured jammu kashmir high alert as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • CRPF
  • High Alert
  • Jammu and Kashmir
  • Terrorist Attack

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.