शारीरिक हल्ल्याबाबतच्या भाषणावरून निवडणूक आयोगाचा तृणमूल काँग्रेसला अल्टिमेटम (फोटो - सोशल मीडिया)
निवडणूक आयोगाने एक्स या सोशल मीडिया साईटवर ऑफिशियल अकाऊंटवरुन ममता बॅनर्जी यांचा पक्षाला अंतिम इशारा देण्यात आला आहे. भाजप नेत्याने केलेल्या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने हा इशारा दिला आहे. आयोगाने लिहिले आहे की, तृणमूल काँग्रेसला निवडणूक आयोगाचा स्पष्ट संदेश आहे की यावेळी पश्चिम बंगालमधील निवडणुका भीती, हिंसाचार, धमक्या, प्रलोभने मुक्त असतील तसेच कोणत्याही छापा, बूथ जॅमिंग आणि सोर्स जॅमिंगशिवाय, असे स्पष्टपणे निवडणूक आयोगाकडून तृणमूल काँग्रेसला सांगण्यात आले आहे.
हे देखील वाचा : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मोहसिना किदवाई यांचे निधन; इंदिरा गांधींशी होता खास स्नेह
पश्चिम बंगाल भाजपने बुधवारी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे (CEC) तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार आणि पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. रायना येथे आयोजित एका सभेत बॅनर्जी यांनी, पक्ष आणि त्याच्या कार्यकर्त्यांविरुद्ध हिंसेच्या उघड धमक्यांसह, अत्यंत आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
चुनाव आयोग की तृणमूल कांग्रेस को दो टूक पश्चिम बंगाल में इस बार चुनाव:
भय रहित,
हिंसा रहित,
धमकी रहित,
प्रलोभन रहित,
छापा रहित,
बूथ एवं सोर्स जामिंग रहित होकर ही रहेंगे ECI’s Straight-talk to Trinamool Congress This time, the Elections in West Bengal would surely be :… pic.twitter.com/p5fM8Uu337 — Election Commission of India (@ECISVEEP) April 8, 2026
“सभेदरम्यान बॅनर्जी म्हणाल्या, ‘पहिल्या टप्प्यात जिथे कुठे मतदान होईल, अगदी उत्तरेकडील प्रदेशांपासून ते जंगलमहालपर्यंत—सर्वांनी मिळून भाजपचे डोके, मान, हात आणि पाय मोडून काढले पाहिजेत. आणि दुसऱ्या टप्प्यात—पूर्व बर्धमान, दक्षिण २४ परगणा, हावडा, हुगळी आणि कोलकाता येथे—आम्ही त्यांची मान आणि पाठीचा कणा मोडून काढू; त्यानंतर ‘बोलो हरी, हरी बोल’ (जे ‘राम नाम सत्य है’ च्या समतुल्य आहे) या जयघोषासह त्यांना निरोप देऊ आणि त्या बाहेरच्या लोकांना सरणावर चढवू,’ असे त्या पत्रात नमूद करण्यात आले होते.”
हे देखील वाचा : तर TMC खासदार टक्कल करणार..; डेरेक ओब्रायन यांचे भाजपला ‘ओपन चॅलेंज






