Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

West Bengal Election 2026 : गजराज आले मतदानाला! झाडग्राममध्ये मतदान केंद्रात थेट महाकाय हत्तीची एन्ट्री

West Bengal Election Voting: पश्चिम बंगालमधील झाडग्राम येथे मतदान केंद्रामध्ये थेट हत्ती घुसल्याची घटना घडली आहे. याठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 23, 2026 | 12:48 PM
Elephant Viral Video at Polling Station in Jadgram West Bengal Election 2026

Elephant Viral Video at Polling Station in Jadgram West Bengal Election 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी
  • जितुसोल प्राथमिक शाळेजवळील मतदान केंद्रामध्ये हत्ती
  • पश्चिम बंगालमध्ये हत्तींचा संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न
West Bengal Election 2026 : झाडग्राम : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 152 जागांसाठी मतदान पार पडत आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बंगालमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक विचित्र घटना घडत आहेत. मुर्शिदाबादच्या नवादा विधानसभा मतदारसंघात तणाव निर्माण झाला होता. आता मात्र झाडग्राममध्ये विचित्र घटना घडली. मतदानकेंद्रावर थेट गजराजाचे आगमन झाल्याने मतदारांची चांगलीच तारांबळ उडाली. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ देखील व्हायरल (Viral News) झाला आहे.

पश्चिम बंगालमधील झाडग्राम येथे मतदानादरम्यान एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले, या ठिकाणी मतदान केंद्रावर चक्क एक हत्ती दिसून आला. ही घटना जितुसोल प्राथमिक शाळेजवळील मतदान केंद्राबाहेर घडली, या ठिकाणी मतदान सुरू होते. मात्र अचानक मतदान केंद्रामध्ये हत्ती आल्याने एकच गदारोळ निर्माण झाला. हत्तीला पाहताच मतदारांमध्ये एकच भीती निर्माण झाली. त्याचबरोबर स्थानिक लोक मोठ्या संख्येने जमले, हत्तीला रस्ता दाखवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. सुदैवाने याठिकाणी मात्र कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

हे देखील वाचा : पहिल्या टप्प्यात चुरशीची लढत; ‘या’ दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

ही घटना अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा निवडणूक आयोग आणि वन विभागाने हत्तीग्रस्त भागांमध्ये आधीच विशेष खबरदारी घेतली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ च्या पहिल्या टप्प्यात, हत्तींच्या मार्गांजवळ असल्यामुळे दक्षिण बंगालमधील सुमारे २५ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. जवळपास ६० टक्के मतदान केंद्रे झाडग्राममध्ये आहेत. माणिकपारा, बेलपहाडी, बन्सपहाडी आणि लालगड यांसारखे भाग विशेषतः संवेदनशील मानले जातात. त्याचप्रमाणे, बांकुरा आणि पश्चिम मेदनापूरच्या काही भागांमध्ये अतिरिक्त खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत. उत्तर बंगालमधील जलदापारा राष्ट्रीय उद्यानाच्या वनक्षेत्रात असलेली सहा मतदान केंद्रेही संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत.

 

West Bengal के झारग्राम में मतदान के दौरान एक हाथी Asian Elephant बूथ के पास पहुंच गया। जितुसोल प्राइमरी स्कूल के बाहर इस दृश्य को देखने के लिए लोग जुट गए, हालांकि किसी तरह की अप्रिय घटना नहीं हुई।#WestBengal #Election #Elephant #Viral #IndiaNews #Trending #navbhartlive pic.twitter.com/8QBH2m58Pz — NavBharat Live (@TheNavbharatliv) April 23, 2026

बंगालमध्ये ७५ ट्रॅकर पथके तैनात
निवडणुकीच्या धामधुमीमध्ये मानव-हत्ती संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने १०-१५ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली अंदाजे ७५ ट्रॅकर पथके तैनात केली आहेत. ही पथके मतदानाच्या ४८ तास आधीपासून २४ तास पाळत ठेवत आहेत. याव्यतिरिक्त, हत्तींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी झारखंड आणि ओडिशाच्या सीमावर्ती भागात ४५०-५०० ड्रॉप गेट्स बसवण्यात आले आहेत.

हे देखील वाचा : बंगाल अन् तमिळनाडूमध्ये लोकशाहीचा उत्सव; मतदानादिवशी PM मोदींनी केले खास आवाहन

याशिवाय, अनेक ठिकाणी एआय-सक्षम सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात असून, एक नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, वन्यजीवांची उपस्थिती असूनही मतदान प्रक्रिया सुरक्षितपणे आणि सुरळीतपणे पार पडावी, हे सुनिश्चित करणे हा या सर्व उपाययोजनांचा उद्देश आहे.

Web Title: Elephant viral video at polling station in jadgram west bengal election 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 12:48 PM

Topics:  

  • Elephant Video
  • West Bengal Election Result 2026

संबंधित बातम्या

बंगाल अन् तमिळनाडूमध्ये लोकशाहीचा उत्सव; मतदानादिवशी PM मोदींनी केले खास आवाहन
1

बंगाल अन् तमिळनाडूमध्ये लोकशाहीचा उत्सव; मतदानादिवशी PM मोदींनी केले खास आवाहन

West Bengal Election 2026: “…नाही तर सनातन धर्मच संपुष्टात येईल”, मतदानादरम्यान शुभेंदु अधिकारी यांचा हिंदू कार्ड वापर
2

West Bengal Election 2026: “…नाही तर सनातन धर्मच संपुष्टात येईल”, मतदानादरम्यान शुभेंदु अधिकारी यांचा हिंदू कार्ड वापर

Bengal Elections 2026: पहिल्या टप्प्यात चुरशीची लढत; ‘या’ दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
3

Bengal Elections 2026: पहिल्या टप्प्यात चुरशीची लढत; ‘या’ दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

West Bengal Assembly Elections 2026: मुर्शिदाबादमध्ये; हुमायूँ कबीर – TMC कार्यकर्ता भिडले, देशी बॉम्बचा वापर; तणावाचे वातावरण
4

West Bengal Assembly Elections 2026: मुर्शिदाबादमध्ये; हुमायूँ कबीर – TMC कार्यकर्ता भिडले, देशी बॉम्बचा वापर; तणावाचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.