Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Epstein चालवायचा भारताचे परराष्ट्र धोरण? हरदीप पुरी यांच्यावर काँग्रेसचा हल्लाबोल

Epstein files India : एपस्टीन फाइल्सवरुन भारताच्या राजकारणातही वादळ उठले आहे. हरदीप सिंग यांचे एपस्टीनशी संबंघ उघड झाल्यानंतर कॉंग्रसने त्याच्यावर हल्लोबोल केला आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 14, 2026 | 02:38 PM
Epstein Files Hardeep Puri Controversy

Epstein Files Hardeep Puri Controversy

Follow Us
Close
Follow Us:
  • हरदीपसिंग पुरी यांच्यावर जेफ्री एपस्टीन प्रकरणावरून काँग्रेसचा हल्लाबोल
  • लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांत गदारोळ
  • हरदीपसिंग पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी
दिल्ली, नवराष्ट्र ब्यूरो. अमेरिकी लैंगिक तस्कर जेफ्री एपस्टीनच्या जाळ्यात अडकलेले केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी विरोधकांचे लक्ष्य ठरले आहेत. पुरी यांच्या बैठका आणि संभाषणांवरून स्पष्ट होते की एपस्टीन हाच भारताचे परराष्ट्र धोरण चालवत होता, असा खळबळजनक आरोप काँग्रेसने केला आहे. पुरी यांची कृती देशासाठी धोकादायक असल्याचे सांगत विरोधी पक्षाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत संसदेच्या आवारात निदर्शने केली. विरोधी सदस्यांनी लोकसभेतही गदारोळ केला. त्यात प्रश्नोत्तराचा तासा विस्कळीत झाला. राज्यसभेतही अशीच परिस्थिती होती.

Epstein Filesमध्ये मोदींच्या मंत्रिमंडळातील नेत्यांचे नाव; खासदार राऊतांचा गौप्यस्फोट

विरोधकांच्या गदारोळातच संसदेचे कामकाज ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा पार पडला आहे. तत्पूर्वी, विरोधी सदस्यांनी गोंधळ घातला आणि पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी केली. यामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेससह विरोधी सदस्य घोषणा देत वेलमध्ये उतरले.

अध्यक्षा संध्या राय यांनी आंदोलक सदस्यांना त्यांच्या जागी परतण्याचे आणि कामकाज सुरू ठेवण्याचे आवाहन केले. या गोंधळातच सत्र ९ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरोपांनंतर मंत्री पुरी यांनी आपण एपस्टीनला काही वेळा भेटले होतो, परंतु त्यांच्या संभाषणांचा त्याच्या गुन्ह्यांशी काहीही संबंध नाही, असे मंत्री हरदीप पुरी यांनी स्पष्ट केले होते.

विरोधकांची संसदेच्या आवारात तीव्र निदर्शने

एपस्टाईन फाइल्सवरून मंत्री पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेच्या आवारात निदर्शने केली. काँग्रेस आणि इतर विरोधी खासदार संसद भवनाच्या मकर गेटजवळ जमले आणि हरदीप पुरी, राजीनामा द्या! अशा घोषणा देत निषेध करत होते. एपस्टीन आणि पुरी यांचे फोटो असलेले मोटे बॅनरही आदोलकांच्या हातात होते.

मोदींच्या मंत्रीमंडळाच एपस्टीनसी संबंध

हरीदप पुरी यांचे एपस्टीनशी संबंध उघड झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावरुन मोठे वक्तव्य केले होते. त्यांनी जेफ्री एपस्टीन फाइल्समध्ये मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा समावेश असल्याचे म्हटले होते. खासदार राऊत म्हणाले की, “आपण एपस्टीन फाइल्समध्ये मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्रीही आहेत. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांचा या लोकांशी संबंध असल्याचं उघड झालं आहे. मोदी सरकार या सँकडलमध्ये अडकलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता. एपस्टिन सोबत या सरकारचे मंत्री किती नाजूक आणि मधूर संबंध ठेवून होते हे तुम्ही पाहिलं आहे. हरदीप पुरींनी आपल्या पदाचा गैरवापर करून एपस्टिनच्या लोकांना भारतात येण्याचा व्हिसा दिला आहे. हे मोदींच्या संमतीने झालं नसेल का?”

Jeffrey Epstein: एपस्टीनशी मोदींचे काय नाते? सरकारने खुलासा करावा; पृथ्वीराज चव्हाण यांची ठाम मागणी

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हरदीपसिंग पुरी यांच्यावर काय आरोप आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी काय होतेय?

    Ans: हरदीप पुरी यांच्या अमेरिकी लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याच्याशी झालेल्या बैठका व संभाषणांमुळे भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

  • Que: मंत्री पुरी यांनी आरोपांवर काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: हरदीपसिंग पुरी यांनी एपस्टीनची भेट घेतल्याचे मान्य केले आहे. परतु त्याच्या गुन्हेगारी कृत्यांशी कोणताही संबंध असल्याच्या आरोपांना पुरी यांनी नाकारले आहे.

Web Title: Epstein files india controversy hardeep puri congress attack resignation demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • Jeffrey Epstein
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: दुर्दैवी! वीज पडून शेतकऱ्यासह 9 गायींचा मृत्यू; अवकाळीचा मोठा फटका
1

Ahilyanagar News: दुर्दैवी! वीज पडून शेतकऱ्यासह 9 गायींचा मृत्यू; अवकाळीचा मोठा फटका

Share Market : 10 लाख करोड रुपयांची लॉटरी! Iran युद्ध संपणार या आशेने Share Market मध्ये उसळी; सेन्सेक्स 1187 अंकांवर
2

Share Market : 10 लाख करोड रुपयांची लॉटरी! Iran युद्ध संपणार या आशेने Share Market मध्ये उसळी; सेन्सेक्स 1187 अंकांवर

Jet Fuel Price Hike: हवाई प्रवाशांना मोठा झटका! इराण युद्धामुळे देशात ATF ₹२ लाखांच्या पार; आता तिकिटांचे दर गगनाला भिडणार
3

Jet Fuel Price Hike: हवाई प्रवाशांना मोठा झटका! इराण युद्धामुळे देशात ATF ₹२ लाखांच्या पार; आता तिकिटांचे दर गगनाला भिडणार

Gujarat Titans चा नवा पार्टनर! इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट IGI आता अधिकृत सर्टिफिकेशन पार्टनर म्हणून सज्ज
4

Gujarat Titans चा नवा पार्टनर! इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट IGI आता अधिकृत सर्टिफिकेशन पार्टनर म्हणून सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.