दिल्लीची मतमोजणी किती वाजता सुरू होणार? कुठे पाहाल अचूक निकाल? वाचा सविस्तर
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान पार पडले आहे. 44 टक्के मतदान काल झाले आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतर काही एक्झिट पोल्स समोर आले. त्यामधून काही धक्कादायक आकडे समोर आले आहेत. सर्व उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. जवळपास सगळेच एक्झिट पोल्सचे आकडे यंदा दिल्लीत सरकार बदलणार असा अंदाज वर्तवत आहेत. एक्झिट पोल्ससोबतच, फलोदी सट्टा बाजाराने देखील आपले अंदाज वर्तवले आहेत.
फलोदी सट्टा बाजाराच्या नव्या अंदाजानुसार, दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाच्या जागा कमी होऊ शकतात. मात्र सरकार आम आदमी पक्षाचे म्हणजे अरविंद केजरीवाल यांचे स्थापन होऊ शकते. राजस्थानच्या फलोदी सट्टा बाजारच्या नवीन अंदाजानुसार, आम यमी पक्षाला 38 ते 40 जागा , भाजप 30 ते 32 जागा, कॉंग्रेस 0 ते 1 जागा जिंकू शकते.
सारासार विचार केल्यास फलोदी सट्टा बाजार आणि एक्झिट पोल्सचे अंदाज हे पूर्णपणे वेगवेगळे आहेत. सट्टा बाजारच्या अंदाजानुसार, आम आदमी पक्षाच्या जागा कमी होतील मात्र त्यांचे सरकार स्थापन होईल. तर एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार, भाजप बहुमत प्राप्त करून सरकार स्थापन करू शकतो. त्यामुळे आता कोणाचे अंदाज खरे ठरणार हे येत्या 8 तारखेलाच स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा: Delhi Election: मतदानाची टक्केवारी घसरल्याने दिल्लीत कोणतं सरकार ‘आप’लंसं होणार? काय आहे 27 वर्षांचा इतिहास? जाणून घ्या
‘सूरज निकलेगा, कमल खिलेगा’; 27 वर्षांनी भाजप दिल्ली जिंकणार?
एक्झिट पोलचे अंदाज पाहिले तर आम आदमी पक्षाला दिल्लीत मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर भारतीय जनता पक्षाला मोठी बढत मिळण्याची शक्यता आहे. जवळपास 11 एक्झिट पोल्स समोर आले आहेत. त्यातील 9 एक्झिट पोल्स हे दिल्लीत भाजपची सत्ता येणार असे अंदाज दर्शवत आहेत. तर 2 एक्झिट पोल्स हे दिल्लीत आप सरकार येईल असे दर्शवत आहे.
11 पैकी 9 एक्झिट पोल्स हे दिल्लीत भाजपला सत्ता स्थापन करता येईल असे दाखवत आहेत. काही एक्झिट पोल्समध्ये तर भाजपा 40 पेक्षा जास्त जागा जिंकेल असे सांगितले जात आहे. तर काही एक्झिट पोल्स 25 पेक्षा अधिक जागा दर्शवत आहेत. मात्र एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार कॉँग्रेसची स्थिती दयनीय असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक पोल्सनुसार कॉँग्रेस 1 ते 3 जागा जिंकू शकते. खरा निकाल 8 तारखेला समोर येईल. मात्र एक्झिट पोल्सनुसार दिल्लीत भाजपचे सरकार येताना दिसत आहेत.
हेही वाचा: Phalodi Satta Bazar: कोण काबीज करणार दिल्लीची सत्ता? नव्या सर्व्हेने उडवली ‘या’ पक्षाची झोप
काय होता फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज?
लोकसभा निवडणुकीत फलोदी सट्टा बाजाराने काही अंदाज वर्तवला होता. आता फलोदी सट्टा बाजाराने दिल्ली विधानसभेसाठी देखील काही अंदाज वर्तवले आहेत. राजस्थानच्या फलोदी सट्टा बाजाराची भविष्यवाणी खरी ठरल्यास यंदा दिल्लीमध्ये चित्र संपूर्णपणे बदलले दिसू शकते. फलोदी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार काहीसे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी कॉँग्रेसची मदत घ्यावी लागेल. तर भाजप हा एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून उदयास येईल. मात्र जराही काही इकडे तिकडे झाल्यास दिल्लीत भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. अर्थात फलोदी सट्टा बाजाराने हे अंदाज वर्तवले आहेत.