
Finance Minister Nirmala Sitharaman mentioned tariffs 24 times in her budget speech 2026
Budget 2026 : नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी १ फेब्रुवारी (रविवार) संसदेत २०२६ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. संपूर्ण देशाचे लक्ष सीतारमण यांच्या घोषणांकडे लागले होते. अर्थसंकल्पातून कोणत्या क्षेत्राला फटका बसतो आणि कोणत्या क्षेत्राला भरघोस सुट मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, अर्थमंत्र्यांच्या भाषणानंतर त्यांच्या भाषणाचे विविध कांगोरे समोर येत आहेत. निर्मला सीतारमण यांच्या भाषणामध्ये अनेकदा टॅरिफ (Tariff) शब्द आला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात एकदाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख केला नाही. मात्र, त्यांनी वारंवार “टॅरिफ” हा शब्द वापरला. सीतारमण यांनी त्यांच्या भाषणात अनेक वेळा वापरलेले इतर अनेक शब्द आहेत.यामध्ये त्यांनी 24 वेळा शब्द वापरला आहे. निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात “इनकम ” हा शब्द सर्वात जास्त, ९८ वेळा वापरला. त्यांनी “ड्युटी” हा शब्द ५१ वेळा आणि “रेट” हा शब्द ४८ वेळा वापरला. निर्मला सीतारमण यांनी प्रत्येक शब्द किती वेळा वापरला याची माहिती आता समोर आली आहे.
हे देखील वाचा : UGC वादाचा उडाला भडका! सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीने प्रशासकीय गोंधळ दूर
कोणता शब्द किती वेळा वापरला?
| शब्द | किती वेळा वापरला याचा आकडा |
|---|---|
| टॅरिफ | 24 |
| इनकम | 98 |
| शुल्क | 51 |
| दर | 48 |
| सवलत | 31 |
| कपात | 34 |
| सेवा | 41 |
| विदेशी | 20 |
| दंड | 31 |
| सीमा शुल्क | 48 |
| वाढ | 18 |
| माल | 47 |
| वैश्विक | 26 |
| क्रेडिट | 18 |
| निर्यात | 17 |
| राष्ट्रीय | 20 |
| निर्माण | 29 |
| परत | 22 |
हे देखील वाचा : Feat वसूली ताई…! Budget 2026 जाहीर होताच नेटकऱ्यांनी अर्थमंत्र्यांना घेरलं, मजेदार MEMES VIRAL
२०२६ च्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा