डॉक्टरचा तरुणीवर बलात्कार
सोनभद्र : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात एका मुलीने दुधी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिराम चेरो यांच्या मुलाविरुद्ध अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी आणि बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.
हेदेखील वाचा : सोलापुरात गतिमंद महिलेवर अत्याचार; आरोपीला कोर्टाचा चांगलाच दणका, सुनावणी ‘ही’ शिक्षा…
आरोपी मंगलम चेरोच्या लहान भावानेही मंगलमला मारहाण केल्याच्या आरोपाखाली मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शुक्रवारी दोन्ही पक्षांविरुद्ध एफआयआर नोंदवून कारवाई सुरू केली. हरिराम चेरो 2017 ते 2022 पर्यंत अपना दल (एस) आमदार होते.
दुधी पोलिसांनी सांगितले की, मुलीचा आरोप आहे की, मंगलम चेरो तिला वारंवार कॉल करून त्रास देतो आणि धमकी देतो की त्याच्याकडे तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ आहेत, जे तो सार्वजनिक करेल. तरुणीच्या आरोपानुसार, आरोपीने तिला 16 नोव्हेंबर रोजी दुधी येथील शिवाजी तलावाजवळ बोलावून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन जवळच्या घरात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
आमदाराच्या लहान मुलास मारहाण
दुसरीकडे, माजी आमदाराचा लहान मुलगा यतेंद्र याने पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे. 16 नोव्हेंबर रोजी त्याचा भाऊ मंगलम दुधी येथील शिवाजी तलावावर कोणाकडून तरी थकबाकीची रक्कम घेण्यासाठी गेला होता. त्याचवेळी तेथील एक मुलगी त्याच्याकडे आली होती. जुन्या वैमनस्यातून मंगलमशी भांडण झाले आणि त्याचवेळी मुलीची आई आणि भाऊ तेथे पोहोचले. त्यानंतर तिघांनी मंगलमला मारहाण करून त्याचे सामान हिसकावले.
मंगलम त्या घटनेपासून बेपत्ता असल्याचा दावा
आपला भाऊ मंगलम त्या घटनेपासून बेपत्ता असल्याचा दावा यतेंद्रने केला आहे. यतेंद्रच्या म्हणण्यानुसार मंगलमचे लग्न ठरले असून, 12 नोव्हेंबरला त्यांचा साखरपुडा होता. तरुणीने पैसे उकळण्यासाठी खोटे आरोप केल्याचे यतेंद्रने सांगितले.
सोलापुरात गतिमंद महिलेवर अत्याचार
गतिमंद महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुरज केंद्रे यांनी 10 वर्षांची सक्तमजुरी व 12 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
हेदेखील वाचा : Crime News: ‘तू जाड आहेस, काळी आहेस म्हणत सासरचे थेट…’; सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल