महावितरणच्या अभियंत्याला मारहाण करणं भोवलं; कोर्टाने सुनावली 'ही' शिक्षा (File Photo : Court)
सोलापूर : गतिमंद महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुरज केंद्रे यांनी 10 वर्षांची सक्तमजुरी व 12 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
हेदेखील वाचा : Crime News: ‘तू जाड आहेस, काळी आहेस म्हणत सासरचे थेट…’; सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल
गणेश अभिमन्यू माने (वय 42, रा. कौठाळी, ता. उत्तर सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित गतिमंद महिलेच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील पीडिता ही गतिमंद असून, ती अपंगही आहे. 6 डिसेंबर 2020 रोजी रात्री पीडिता ही तिच्या घरातील खोलीत झोपली होती. यावेळी आरोपी गणेश माने याने पीडितेच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला.
याबाबत सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक देवडे यांनी तपास करून आरोपीला अटक केली. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून दिले. या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश केंद्रे यांच्यासमोर झाली. या खटल्यात सरकारतर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडितेचा भाऊ आणि डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली.
सरकारी वकिलांचा महत्त्वपूर्ण युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश केंद्रे यांनी आरोपी गणेश माने याला बलात्कारप्रकरणी 10 वर्षे सक्तमजुरी व 12 हजार रुपये दंड आणि दंड नाही भरला तर 3 महिने साधी कैद एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड आणि दंड नाही भरला तर एक महिना साधी कैद आणि दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा सुनावली.
याप्रकरणी सरकारतर्फे ऍड. शीतल डोके यांनी तर आरोपीतर्फे ऍड. सागर पवार यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलिस कर्मचारी रंजना जमादार यांनी काम पाहिले.
अकोट न्यायालयाने फेटाळला जामीन
तर दुसरीकडे अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. यातील आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज अकोट सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र तसेच विशेष न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी निकाल दिला. याप्रकरणाची फिर्याद दहीहांडा पोलिस स्टेशनच्या येथे दाखल करण्यात आली होती.
हेदेखील वाचा : महाराष्ट्रातील या परिस्थितीला निवडणूक आयोग अन् सुप्रीम कोर्ट जबाबदार; संजय राऊतांचा घणाघात