Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुजरातच्या सुरतमधील कापड बाजारात भीषण आग; शेकडो दुकानं जळून खाक, अग्निशनमच्या 50 पेक्षा जास्त गाड्या दाखल

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 50 हून अधिक गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. या सर्व वाहनांच्या चार ते पाच फेऱ्या झाल्या. आग विझवण्यासाठी सुमारे 200 अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 27, 2025 | 07:49 AM
गुजरातच्या सुरतमधील कापड बाजारात भीषण आग; शेकडो दुकानं जळून खाक, अग्निशनमच्या 50 पेक्षा जास्त गाड्या दाखल

गुजरातच्या सुरतमधील कापड बाजारात भीषण आग; शेकडो दुकानं जळून खाक, अग्निशनमच्या 50 पेक्षा जास्त गाड्या दाखल

Follow Us
Close
Follow Us:

सूरत : गुजरातच्या सूरत येथे कापड बाजारात भीषण आग लागली. गेल्या 24 तासांत दुसऱ्यांदा ही आग लागली. या आगीत लक्षणीय वाढ झाल्याने ही आग मार्केटच्या पाचव्या मजल्यावर पसरली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 50 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सूरतमधील शिवशक्ती कापड बाजारात भीषण आग लागली. मार्केटमध्ये सुमारे 800 दुकाने असून, ती सर्व कपड्याची आहेत. त्यामुळे आग वेगाने पसरली आणि जवळपास संपूर्ण इमारतीला आग लागली.

#WATCH | Gujarat: Operation continues to douse the fire which broke out at a Textile store in Surat, earlier today. pic.twitter.com/4ezYJEiCoR

— ANI (@ANI) February 26, 2025

सूरतमध्ये लागलेल्या या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये आग किती प्रमाणात पसरली आहे, हे पाहायला मिळत आहे. अग्निशमन विभागाच्या पथकाने आग आणखी पसरण्यापासून रोखले असले तरी या आगीमुळे शिवशक्ती टेक्सटाईल मार्केटचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या इमारतीला आग लागली तेथे सुमारे 800 दुकाने असल्याने आग आटोक्यात आणण्याचे हे आव्हान होते.

संपूर्ण परिसर केला रिकामा 

या घटनेनंतर सुरतच्या पोलिसांनी सांगितेल की, अग्निशमन विभागाच्या पथकांनी शिवशक्ती टेक्सटाईल मार्केटमधील आग आटोक्यात आणली आहे. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली होती. पोलिसांनी बाधित क्षेत्र रिकामे केले. या आगीत किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवशक्ती मार्केटमध्ये 800 पेक्षा जास्त कापडाची दुकाने असल्याचे त्यांनी सांगितले. जवळपासच्या बाजारपेठांमधील दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत.

200 हून अधिक अग्निशमन दलाच्या जवानांनी विझवली आग 

सर्व 800 दुकाने बंद करण्यात आली आहेत. या बाजाराशिवाय आजूबाजूची इतर दुकानेही बंद करण्यात आली आहेत. दुसरीकडे, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी मोठी आग लागल्याचे सांगितले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या ५० हून अधिक गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. या सर्व वाहनांच्या चार ते पाच फेऱ्या झाल्या. आग विझवण्यासाठी सुमारे 200 अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. या सर्व कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणली.

हेदेखील वाचा : Swargate Bus Depot : कंडोम, साड्या, शर्ट, अंतर्वस्त्र अन्…, स्वारगेट डेपोतील जुन्या बसमध्ये सापडल्या धक्कादायक गोष्टी

Web Title: Fire in textile store in surat gujrat nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2025 | 07:49 AM

Topics:  

  • Fire News
  • Gujrat

संबंधित बातम्या

Pune Fire News : पुण्यात TVS शोरुम आणि सर्व्हिंस सेंटरला आग! 60 हून अधिक गाड्या जळून खाक
1

Pune Fire News : पुण्यात TVS शोरुम आणि सर्व्हिंस सेंटरला आग! 60 हून अधिक गाड्या जळून खाक

भारताचं ते रहस्यमयी मंदिर, जे दिवसातून दोनदा अचानक होतं गायब… सत्य वाचताच तुम्हालाही बसेल धक्का
2

भारताचं ते रहस्यमयी मंदिर, जे दिवसातून दोनदा अचानक होतं गायब… सत्य वाचताच तुम्हालाही बसेल धक्का

भारतातील 5 वैभवशाली प्राचीन शहरं जी जगातून अचानक झाली गायब; आजतागत शास्त्रद्यांना उलगडले नाही याचे रहस्य
3

भारतातील 5 वैभवशाली प्राचीन शहरं जी जगातून अचानक झाली गायब; आजतागत शास्त्रद्यांना उलगडले नाही याचे रहस्य

Iraq Fire Break Out : इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, 50 जणांचा होरपळून मृत्यू
4

Iraq Fire Break Out : इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, 50 जणांचा होरपळून मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.