पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली. एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला. आरोपी तरुणानं गोड बोलून पीडितेला फूस लावली. फलटणला निघालेल्या तरुणीला त्यानं शिवशाही बसमध्ये नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव आहे. त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
स्वारगेट डेपोतील जुन्या बसमध्ये सापडल्या धक्कादायक गोष्टी
पुण्यात भल्यापहाटे स्वारगेट एसटी आगारात अत्याचाराची घटना घडली आहे. एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला. आरोपी अद्याप फरार आहे.
आरोपीचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी त्याच्या भावाला शिरूर येथील त्याच्या राहत्या गावातून चौकशीसाठी घेतलं ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आठ टीम कडून आरोपीचा शोध सुरु आहे.
स्वारगेट एसटी स्टँडमध्ये घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार आहे. या अगोदर दत्तात्रयवर शिरुर पोलिस स्थानकात चोरीचे, साखळी चोरल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
तर दुसरीकडे याच आगारात बंद स्थितीत असलेल्या शिवशाही बसमध्ये नेमकं काय चालतं, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आगारात बंद असलेल्या शिवशाही बसेस उभ्या आहेत. त्या बसमध्ये ब्लँकेट्स, शर्ट, साड्या, अंतर्वस्त्रं आढळली आहेत.
याच बसमध्ये वापरलेले कंडोम, त्यांची पाकिटंही सापडली आहेत. त्यामुळे बंद असलेल्या शिवशाही बसेसमध्ये नेमके काय प्रकार चालतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे.