लडाखमधील सियाचीन येथील उंच बर्फाळ पर्वतांच्या रणांगणात देशाच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. सियाचीन ग्लेशियरच्या धोकादायक भागात कर्तव्य बजावताना महाराष्ट्राच्या या सुपुत्राला वीरमरण (first Agniveer Akshay Laxman Gawate) आलं. भारतीय लष्कराने रविवारी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
[read_also content=”गुजरातमध्ये गरबा खेळताना गेल्या 24 तासांत हृदयविकाराच्या झटक्याने 10 जणांचा मृत्यू! https://www.navarashtra.com/latest-news/10-people-died-of-heart-attack-in-last-24-hours-while-playing-garba-in-gujarat-nrps-473017.html”]
भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने शोकाकुल कुटुंबाप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत. भारतीय लष्कराने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, या दुःखाच्या प्रसंगी ते शोकाकुल कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
ट्विटरवरील आपल्या अधिकृत खात्यावरील संदेशात, भारतीय सैन्याने म्हटले आहे की, भारतीय सैन्याच्या सर्व श्रेणीतील अग्निवीर (ऑपरेटर) गवते अक्षय लक्ष्मण यांच्या सियाचीनमधील सर्वोच्च बलिदानाला सलाम. .. या घडीला भारतीय लष्कर शोकाकुल कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहे.” महाराष्ट्राचे अग्निवीर गवते अक्षय लक्ष्मण यांच्या निधनाबद्दल लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि दलाच्या सर्व स्तरांनी शोक व्यक्त केला आहे.
Agniveer (Operator) Gawate Akshay Laxman is the first Agniveer to have laid down his life in operations. He was deployed in the world’s highest battlefield Siachen glacier. pic.twitter.com/kLJlpZ7Ylk — ANI (@ANI) October 22, 2023
काराकोरम पर्वत रांगेत सुमारे 20,000 फूट उंचीवर असलेले सियाचीन ग्लेशियर हे जगातील सर्वोच्च लष्करी क्षेत्र म्हणून ओळखले जाते. जेथे सैनिकांना अत्यंत थंड आणि जोरदार वाऱ्याचा सामना करावा लागतो. लक्ष्मण यांच्या मृत्यूचे कारण काय, हे अद्याप समजू शकलेले नाही.






