सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसामुळे बागायती शेतीला मोठा फटका बसला आहे. आंबा, काजू, जांभूळ आणि कोकम पिकांचे नुकसान झाले असून विशेषतः हंगामाच्या शेवटच्या टप्प्यातील फळांची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. आधीच कमी उत्पादन असलेल्या आंबा पिकावर या पावसाचा अधिक परिणाम झाला असून तिसऱ्या टप्प्यातील फळे झाडावरून गळून पडत आहेत. काजू पिकावरही संकट ओढवले असून जांभूळ आणि कोकम पिकांनाही ढगाळ वातावरणाचा फटका बसला आहे. या परिस्थितीमुळे बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिक मदत द्यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून होत आहे.