Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राम मंदिरासाठी देश-विदेशातून येताहेत भेटवस्तू; तब्बल 2100 किलोंची घंटा तर 108 फुटांची अगरबत्ती अन् बरंच काही…

अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी होत आहे. या सोहळ्यासाठी देश विदेशातून भेटवस्तू येत आहे. नेपाळ आणि श्रीलंकेतूनही राम मंदिरासाठी विशेष भेट आली आहे. नेपाळ म्हणजेच जनकपूर देवी सीता मातेची जन्मभूमी आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 12, 2024 | 10:18 AM
राम मंदिरासाठी देश-विदेशातून येताहेत भेटवस्तू; तब्बल 2100 किलोंची घंटा तर 108 फुटांची अगरबत्ती अन् बरंच काही…
Follow Us
Follow Us:

अयोध्या : अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी होत आहे. या सोहळ्यासाठी देश विदेशातून भेटवस्तू येत आहे. नेपाळ आणि श्रीलंकेतूनही राम मंदिरासाठी विशेष भेट आली आहे. नेपाळ म्हणजेच जनकपूर देवी सीता मातेची जन्मभूमी आहे. नेपाळमधून भगवान रामसाठी तीन हजारांपेक्षा जास्त भेटवस्तू आल्या आहेत. त्यात चांदीचे बूट, विविध प्रकाराचे दागिने, कपडे यांचा समावेश आहे. जनकपूरवरून तीन वाहनांच्या ताफ्यातून या भेटवस्तू येत आहेत.

प्रभू श्रीरामासाठी बनवला 1100 किलोचा दिवा : सोशल मीडियावर राम मंदिरातील आणि त्या संबंधीत फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहे. राम मंदिराच्या उ‌द्घाटनासाठी अनेक जण उत्सूक आहेत. अनेक लोक त्या दिवशी अयोद्धेत आणि आपआपल्या घरी दिवे लावून दिवाळी साजरी करणार आहे. देशभरात अनेक ठिकाणी त्या दिवशी जल्लोष साजरा केला जाणार आहे. रामभक्त अनेक प्रकारे हा दिवस साजरा करताना दिसून येणार आहे. अशातच वडोदराचे रामभक्त अरविंदभाई पटेल यांनी रामललासाठी 1100 किलोचा दिवा बनवला आहे.

विविध भेटवस्तू

गुजरातमधील वडोदरा येथून 108 फूट लांब अगरबत्ती येत आहे. सहा महिन्यांपासून ही अगरबत्ती तयार करण्याचे काम सुरु होते. या अगरबत्तीचे वजन 3.610 किलोग्रॅम आहे. 3.5 फूट रुंद ही अगरबत्ती आहे. ही अगरबत्ती दीड महिन्यापर्यंत चालणार आहे. अगरबत्तीचा सुंगध अनेक किलोमीटर लांब जाणार आहे. ही अगरबत्ती करण्यासाठी 376 किलो गुग्गल, 376 नारळ, 190 तूप, 1,470 गायीचे शेण, 420 जडीबुटीचा वापर केला.

गुजरातमधील दरियापूर येथून अखिल भारतीय दबगर समाजाने तयार केलेला नगाडा (मंदिराचा ढोल) येणार आहे. मंदिराच्या प्रांगणात हा नगाडा असणार आहे. त्याच्यावर सोन्याचा मुलामा लावण्यात आला आहे. यामुळे मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे लक्ष या नगाडाकडे जाणार आहे.

सुरतमधून सीता मातेसाठी केलेली विशेष साडी येत आहे. या साडीवर भगवान राम आणि अयोध्येतील मंदिराची प्रतिमा आहे. ही साडी तयार करण्यासाठी 5,000 अमेरिकी डायमंड आणि 2 किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे.

Web Title: Gifts are pouring in for the ram temple from country and abroad also nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2024 | 10:18 AM

Topics:  

  • ayodhya
  • ram mandir
  • ram mandir news
  • Ram Temple

संबंधित बातम्या

Ram Mandir Recruitment: राम मंदिरात ‘काउंटिंग स्टाफ’ची भरती कशी होते? जाणून घ्या पात्रता निकष आणि निवड प्रक्रिया एका क्लिकवर..
1

Ram Mandir Recruitment: राम मंदिरात ‘काउंटिंग स्टाफ’ची भरती कशी होते? जाणून घ्या पात्रता निकष आणि निवड प्रक्रिया एका क्लिकवर..

Ram Mandir Scam: दान चोरी प्रकरणात संघ नेत्यावर खळबळजनक आरोप; कंत्राटदारांकडून ५-५ लाखांची कथित वसुली?
2

Ram Mandir Scam: दान चोरी प्रकरणात संघ नेत्यावर खळबळजनक आरोप; कंत्राटदारांकडून ५-५ लाखांची कथित वसुली?

Ram Mandir Scam: २ जागांवरून सत्तेचे शिखर गाठलेल्या भाजपची ‘अग्निपरीक्षा’; राम मंदिर निधी वादाने राजकारण तापले
3

Ram Mandir Scam: २ जागांवरून सत्तेचे शिखर गाठलेल्या भाजपची ‘अग्निपरीक्षा’; राम मंदिर निधी वादाने राजकारण तापले

‘राम मंदिरातील देणग्यांच्या हिशोबावर प्रश्नचिन्ह’; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप, केंद्र सरकारवरही साधला निशाणा
4

‘राम मंदिरातील देणग्यांच्या हिशोबावर प्रश्नचिन्ह’; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप, केंद्र सरकारवरही साधला निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.