पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राघव चढ्ढा यांना 'GTA 6' गेमची भुरळ (फोटो - इन्स्टाग्राम)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या गेमवर आधारित पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी गेल्या काही वर्षांत भारताने अर्थव्यवस्था, गरिबी निर्मूलन, स्वच्छता, सौर ऊर्जा क्षमता, अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप्स, विद्युतीकरण, इंटरनेट सेवा, जागतिक बाजारपेठ आणि नक्षलग्रस्त जिल्ह्यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत केलेल्या प्रगतीबाबत लक्षवेधी पोस्ट केली आहे. यामध्ये गेमिंग स्वरुपात देशातील विकास सांगण्यात आला आहे. याचबरोबर पंतप्रधान मोदींनी ‘भारत हा पूर्णपणे नवी गेम खेळतोय,’ अशा आशयाचे कॅप्शन लिहिले आहे.
याचबरोबर राज्यसभा राघव चढ्ढा यांनीही इन्स्टाग्रामवर त्यांचा गेम सुरू होण्याचा क्षण सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी टीव्हीवर ते गेमसाठी तयार असून गेम सुरू होताना काऊंनटाऊन संपत आल्याचे दिसून आले आहे. जीटीए गेम सुरू झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आल्याचे दिसून आले आहे. याचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले, ‘रात्रीची ११:५९ ही वेळ इतकी मोठी कधीच वाटली नव्हती.’
Raghav’s reason for playing is simple he knows he can switch characters even in this game! 😉 https://t.co/ivp6HiUaZE — Rattan Dhillon (@ShivrattanDhil1) November 19, 2026
सोशल मीडिया राजकीय नेत्यांच्या या गेम खेळताना व्हिडीओ व्हायरल झाल्या असून यामुळे भारतामध्ये सर्वत्र या गेमची चर्चा असल्याचे दिसून आली आहे. या गेमची सर्वत्र क्रेझ असून यातून पंतप्रधान मोदी व खासदार राघव चढ्ढाही सुटले नसल्याचे दिसून आले. या पोस्टच्या माध्यमातून सत्ताधारी नेते हे झेन-जी ला जोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले आहे.
Ans: GTA 6 म्हणजे Grand Theft Auto VI. हा Rockstar Gamesच्या लोकप्रिय Grand Theft Auto मालिकेतील पुढील मुख्य ओपन-वर्ल्ड अॅक्शन-अॅडव्हेंचर गेम आहे.
Ans: पंतप्रधान मोदी यांनी GTA 6 च्या गेमिंग शैलीचा वापर करून भारताच्या विविध क्षेत्रांतील विकास आणि प्रगती अधोरेखित करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.
Ans: राघव चढ्ढा यांनी गेम सुरू होण्याच्या काऊंटडाऊनचा आणि गेम सुरू झाल्यानंतरचा क्षण दाखवणारा व्हिडीओ शेअर केला. त्यासोबत त्यांनी रात्री ११:५९ ची वेळ कधी नव्हे इतकी मोठी वाटल्याचे म्हटले.






