योगी आदित्यनाथ हे त्यांच्या कानाता कर्णकुंडलं का घालतात (फोटो - नवभारत)
Yogi Adityanath Golden Earrings : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नेहमी त्यांच्या भाषणांमुळे, धडक कारवायांमुळे चर्चेत असतात. मुख्यमंत्री पदासह ते गोरखनाथ मंदिराचे महंतही आहेत. योगी आदित्यनाथ हे गोरखपीठाचे पीठाधीश्वर (प्रमुख) देखील आहेत. यामुळे ते नेहमी भगव्या रंगाच्या वस्त्रामध्ये दिसून येतात. हाच पोषाख त्यांची ओळख बनला आहे. याचबरोबर त्यांच्या दोन्ही कानात सोन्याची कुंडलं असल्याचे दिसून येतात. ही घालण्यामागे कारण असल्याचे समोर आले आहे.
योगी आदित्यनाथ दोन्ही कानांत कर्णभूषणे का घालतात?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन्ही कानांत कुंडलं घालतात कारण ते नाथ पंथाच्या धार्मिक परंपरेशी जोडलेले आहे. योगी आदित्यनाथ हे गोरखपीठाचे प्रमुख आहेत आणि त्यांनी नाथ पंथात दीक्षा घेतली आहे. या पंथात, दीक्षेच्या वेळी कान टोचून कर्णभूषणे घालण्याची प्रथा आहे. ही कर्णभूषणे संन्यासी व्यक्तीची आध्यात्मिक ओळख, गुरु परंपरा आणि पंथाशी असलेल्या संबंधाचे प्रतीक मानली जातात.
मुख्यमंत्री योगींच्या कर्णभूषणांचे वजन किती?
२०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत गोरखपूर सदर विधानसभा जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना योगी आदित्यनाथ यांनी आपल्या कर्णभूषणांचे वजन जाहीर केले. निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रानुसार, मुख्यमंत्री योगींची दोन्ही कर्णभूषणे सोन्याची आहेत. त्यांचे एकूण वजन २० ग्रॅम आहे, म्हणजेच एका कर्णभूषणाचे वजन १० ग्रॅम आहे. योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दोन्ही कानातल्यांची किंमत ४९,००० रुपये असल्याचे नमूद केले आहे.
मुख्यमंत्री योगींच्या सोन्याच्या कानातल्यांची सध्याची किंमत किती आहे? २०२२ मध्ये, १० ग्रॅम सोन्याचा भाव ४६,००० ते ५२,००० रुपये होता. सध्या, १० ग्रॅम सोन्याचा भाव सुमारे १,३६,००० रुपये आहे. त्यामुळे, सध्याच्या किमतींच्या आधारे मुख्यमंत्री योगींच्या कानातल्यांच्या किमतीचा अंदाज लावल्यास, त्यांची किंमत किमान २,००,००० ते २.५ लाख रुपये असू शकते. तथापि, सोन्याची किंमत त्याच्या शुद्धतेनुसार, म्हणजेच कॅरेटनुसार बदलू शकते.
Ans: नाथ पंथाच्या धार्मिक परंपरेनुसार दीक्षेच्या वेळी कान टोचून कर्णभूषणे घालण्याची प्रथा आहे. योगी आदित्यनाथ नाथ पंथाचे प्रमुख असल्याने ही कुंडलं त्यांच्या आध्यात्मिक परंपरेचा भाग आहेत.
Ans: २०२२ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या दोन्ही कर्णभूषणांचे एकत्रित वजन २० ग्रॅम असून, प्रत्येकाचे वजन सुमारे १० ग्रॅम आहे.
Ans: सोन्याचा सध्याचा दर, शुद्धता आणि कॅरेट यानुसार किंमत बदलते. २० ग्रॅम सोन्याच्या दिलेल्या दरानुसार त्यांची मूलभूत किंमत सुमारे २.७ लाख रुपये होऊ शकते.






