मुंबई: काल मुंबईच्या वरळी येथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा विजयी मेळावा पार पडला. राज्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये हिंदी भाषेची सक्ती होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा ठाकरे बंधूंनी सरकारला दिला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका करत यास्तन गुजरातनिवडणुकीबद्दल भाष्य केले होते. तेव्हा त्यांनी केलेल्या एका विधानामुळे गुजरातमधील पटेल समाज नाराज झाल्याचे म्हटले जात आहे.
महाराष्ट्र सरकारने हिंदी भाषा संदर्भातील जीआर मागे घेतल्याने ठाकरे बंधु यांनी विजयी मेळाव्याचे आयोजन केले होते. तब्बल 20 वर्षांनी उद्धव आणि राज ठाकरे एकत्रितपणे आले होते. दरम्यान हिंदी भाषेच्या विष्यवारून राज आणि उद्धव ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला. तसेच भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी गुजरातच्या 2022 मधील विधानसभा निवडणुकीत पाटीदार समाजात फुट पडल्याचा आरोप भाजपवर केला होता.
2017 च्या गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जिंकण्यासाठी पटेल समाजाला भडकावले आणि अन्य समुदायापासून वेगळे केले, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर आता गुजरात भाजपने या व्यक्तव्याचा समाचार घेतला आहे.
उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंच्या जय गुजरातवर टोला
रळी येथील विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, “तो एक गद्दार काल बोलला जय गुजरात… किती लाचारी करायची? तो पुष्पा पिक्चर तुम्ही पाहिला आहे. दाढीवरती हात फिरवून म्हणायचं झुकेगा नहीं साला, तसं हे गद्दार म्हणतात उठेगा नहीं साला. कुछ भी बोलो उठेगाही नहीं… अरे कसे उठणार आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं.. म्हणजेच विचार वगैरे असं मी म्हणतोय…”
उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, ‘जय गुजरात’ अशी घोषणा देणारा बाळासाहेब ठाकरे यांचा पाईक असू शकत नाही. “हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांचा पाईक असू शकेल? आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? मगा आता उघडा डोळे बघा नीट… कारण आता डोळे उघडले नाहीत तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही, ते कायमचे मिटून जातील. आता आलेली जाग जर जाणार असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका.नेहमीच हरवून जाल. आ आली जाग जर जान असेल, पण फक्त स्वतःला मराठीप्रेमी मुलगा म्हणवू नका.
भाजप आणि पटेल एकाच नाण्याच्या दोन बाजू- गुजरात भाजप
उद्धव ठाकरे यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करण्याआधी पडताळणी करणे आवश्यक होते. उद्धव ठाकरे यांना गुजरातबद्दल
काहीही माहिती नाही. गुजरातमध्ये भाजप आणि पटेल एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. गुजरातमध्ये पटेल समाजाचे तीन
मुख्यमंत्री आणि अनेक प्रदेशाध्यक्ष भाजपने दिले आहेत , असे गुजरात भाजपचे प्रवक्ता डॉ. रुतीज पटेल म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी कॉँग्रेसची भाषा वापरणे टाळले पाहिजे. गुजरातमध्ये भाजपसाठी पटेल समाजाने महत्वाची भूमिका बजावली आहे. आणि त्या बदल्यात भाजपने पटेल समाजाची प्रगती सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली असल्याचे भाजप प्रवक्ते हितेंद्र पटेल म्हणाले.