“तो एक गद्दार काल बोलला जय गुजरात…", उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंच्या जय गुजरातवर टोला (फोटो सौजन्य-X)
Uddhav Thackeray on eknath Shinde In Marathi : राज्यातील इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर आज (5 जुलै) विजयी मेळाव्यातील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर दिसले. आज (५ जुलै) मुंबईतील वरळी येथे एक विजयी मेळावा झाला. या मेळ्यात दोन्ही नेते सत्ताधारी सत्तेवर सडकून टीका करताना दिसले. यावेळी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी ‘जय गुजरात’ अशी घोषणा देणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली.
पुण्यातील गुजराती समुदायाकडून विकसित केलेल्या जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन शुक्रवारी (४ जुलै) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. उद्घाटन कार्यक्रमात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात’ अशी घोषणा केली. या घोषणेनंतर त्यांच्यावर टीका केली जात आहे.
दरम्यान वरळी येथील विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, “तो एक गद्दार काल बोलला जय गुजरात… किती लाचारी करायची? तो पुष्पा पिक्चर तुम्ही पाहिला आहे. दाढीवरती हात फिरवून म्हणायचं झुकेगा नहीं साला, तसं हे गद्दार म्हणतात उठेगा नहीं साला. कुछ भी बोलो उठेगाही नहीं… अरे कसे उठणार आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं.. म्हणजेच विचार वगैरे असं मी म्हणतोय…”
उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, ‘जय गुजरात’ अशी घोषणा देणारा बाळासाहेब ठाकरे यांचा पाईक असू शकत नाही. “हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांचा पाईक असू शकेल? आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? मगा आता उघडा डोळे बघा नीट… कारण आता डोळे उघडले नाहीत तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही, ते कायमचे मिटून जातील. आता आलेली जाग जर जाणार असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका.नेहमीच हरवून जाल. आ आली जाग जर जान असेल, पण फक्त स्वतःला मराठीप्रेमी मुलगा म्हणवू नका.