Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरेंची आमदारकी धोक्यात ? भाजप आणि शिंदेसेनेच्या बड्या नेत्यांनी डिवचलं

राज्यात सध्या महायुतीकडे २३५ आमदारांचे भक्कम पाठबळ आहे. या संख्याबळाच्या जोरावर महायुतीचे ७ उमेदवार सहजपणे विधान परिषदेवर निवडून जाऊ शकतात.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 09, 2026 | 12:25 PM
Keshav Upadhye slams Uddhav Thackeray over attendance in Vidahan Parishad, Uddhav Thackeray Vidhan parishad Attendance,

Keshav Upadhye slams Uddhav Thackeray over attendance in Vidahan Parishad, Uddhav Thackeray Vidhan parishad Attendance,

Follow Us
Follow Us:
  • उद्धव ठाकरेंसमोर विधान परिषदेचे मोठे आव्हान
  • १३ मे २०२६ मध्ये ठाकरे यांची विधान परिषदेची मुदत संपत आहे
  • महायुतीकडे २३५ आमदारांचे भक्कम पाठबळ
Uddhav Thackeray News: राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे संख्याबळ पाहता त्यांना पुन्हा विधानपरिषदेवर संधी मिळणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहे. या सगळ्या घडामडींवर भाजपचे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सूचक विधान केलं आहे.

भाजप नेते पंकज भोयर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. त्याचवेळी विरोधकांच्या विस्कळीत नियोजनावरही जोरदार टीका केली आहे. “आजच्या निकालात महायुतीला मिळणारे यश हे सरकारने गेल्या अडीच वर्षांत केलेल्या विकासकामांची पावती आहे. जनतेने विरोधकांना पूर्णपणे नाकारले आहे. काँग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळेच त्यांच्यावर स्वबळावर लढण्याची वेळ आली,” असे मत भोयर यांनी व्यक्त केले. (Maharashtra Politics)

ZP Election Results : साताऱ्यात भाजप आघाडीवर तर राष्ट्रवादी 14 जागांवर…; अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

उद्धव ठाकरेंसमोर विधान परिषदेचे मोठे आव्हान यावेळी भोयर यांनी उद्धव ठाकरे यांच्या आगामी राजकीय अडचणींकडेही लक्ष वेधले.  १३ मे २०२६ मध्ये ठाकरे यांची विधान परिषदेची मुदत संपत असून, सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार त्यांच्याकडे केवळ २० आमदार आहेत. निवडून येण्यासाठी आवश्यक असलेला ३० मतांचा कोटा गाठणे ठाकरेंसाठी कठीण असल्याचे त्यांनी नमूद केले. “काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या मदतीशिवाय त्यांना पुन्हा निवडून येणे शक्य नाही, परंतु महाविकास आघाडीत राज्यसभेवरून सुरू असलेली ओढाताण पाहता ठाकरेंची वाट खडतर दिसते,” असा टोलाही त्यांनी लगावला.

सयाजी शिंदेंच्या राजकारणावरून टोला प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सक्रिय राजकारणाबाबत बोलताना भोयर यांनी आश्चर्य व्यक्त केले. “ते उत्तम अभिनेते आहेत, पण ते अचानक सक्रिय राजकारणात चर्चा कधीपासून करायला लागले? यावर विश्वास बसत नाही,” अशा शब्दांत त्यांनी शिंदेंच्या राजकीय भूमिकेवर टिप्पणी केली.

त्याचवेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनीदेखील याच मुद्द्यावरून ठाकरे गटाला डिवचलं आहे. ” विधानपरिषदेची निवडणूक ही संख्याबळावर होत असते. आमच्याकडे २३७ आमदार आहेत. समोरच्यांकडे किती आमदार आहेत, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे उगाचच कुणी धाडस करू नये, याची एक कार्यकर्ता म्हणून मला पूर्ण कल्पना आहे.” असा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे.

Maharashtra EVM Controversy: ढाब्यावर सापडलेल्या ‘त्या‌’ दोन राखीव ईव्हीएम प्रकरणावर निवडणूक

राज्यातील जिल्हा परिषद निकालांच्या धामधुमीतच आता विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सध्याचे विधानसभेतील पक्षीय संख्याबळ पाहता महायुतीचे पारडे जड दिसत असून, महाविकास आघाडी आणि विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यासमोर स्वतःची जागा निवडून आणण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

राज्यात सध्या महायुतीकडे २३५ आमदारांचे भक्कम पाठबळ आहे. या संख्याबळाच्या जोरावर महायुतीचे ७ उमेदवार सहजपणे विधान परिषदेवर निवडून जाऊ शकतात. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे माकप आणि शेकापसह केवळ ४८ आमदारांचे बळ असून, त्यांना आपल्या जागा टिकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

Eknath Shinde Birthday : गेमचेंजर शिंदे! रिक्षावाला ते मुख्यमंत्री थक्क करणारा राजकीय प्रवास

ठाकरेंसाठी ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’चा आधार ठरणार निर्णायक

शिवसेना (ठाकरे गट) कडे विधानसभेत केवळ २० आमदार आहेत. विधान परिषदेची एक जागा जिंकण्यासाठी साधारण २९ ते ३० मतांच्या कोट्याची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांना पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या अतिरिक्त मतांची नितांत गरज भासणार आहे. जर ठाकरेंनी राज्यसभा किंवा विधान परिषदेच्या इतर जागांसाठी मित्रपक्षांना पाठिंबा दिला, तरच त्यांच्यासाठी विधान परिषदेचा मार्ग मोकळा होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात उतरणार की पक्षातील एखाद्या नव्या चेहऱ्याला संधी देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Is uddhav thackerays membership as an mla in jeopardy criticism from senior leaders of the bjp and the shinde faction of shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 12:25 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Mahavikas Aghadi Politics
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

‘धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंमध्ये’; बच्चू कडूंचा मोठा दावा, ठाकरे-शिंदे गटाच्या सुनावणीवर म्हणाले…
1

‘धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंमध्ये’; बच्चू कडूंचा मोठा दावा, ठाकरे-शिंदे गटाच्या सुनावणीवर म्हणाले…

Eknath Shinde : एसटी बसस्थानकांचा कायापालट होणार! १४७ बसस्थानकांचा पुनर्विकास, एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठा निर्णय
2

Eknath Shinde : एसटी बसस्थानकांचा कायापालट होणार! १४७ बसस्थानकांचा पुनर्विकास, एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठा निर्णय

Shivsena Supremacy Battle: निवडणूक आयोगाचा निर्णयच चुकीचा!; कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने सर्वोच्च न्यायालयात खळबळ
3

Shivsena Supremacy Battle: निवडणूक आयोगाचा निर्णयच चुकीचा!; कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने सर्वोच्च न्यायालयात खळबळ

Sangli News : दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा केलेल्या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या; एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4

Sangli News : दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा केलेल्या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या; एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.