अहमदाबाद: Vijay Rupani Death News: आज अहमदाबादच्या मेघानीनगर येथे लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. उड्डाण केल्यानंतर केवळ काही मिनिटांतच हे विमान रहिवाशी भागात कोसळले. यामध्ये 242 प्रवासी प्रवास करत होते. त्यातल 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. अद्याप खरा आकडा समोर आला नाही. मात्र या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे निधन झाले आहे.
अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाचे विमान मेघानीनगर परिसरात कोसळले. या विमानात 242 प्रवासी होते. तर याच विमानातून गुजरत भाजपचे नेते. गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि चांदीगड, पंजाबचे प्रभारी विजय रूपाणी देखील प्रवास करत होते. दरम्यान गुजरात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांनी विजय रूपाणी यांच्या मृत्यूबद्दल सांगितले आहे.
BREAKING: BJP Leader CR Patil confirms the death of former Gujarat CM Vijay Rupani in the Air India plane crash in Ahmedabad. Offers condolences to the departed soul.
Rest in peace, Rupani ji. 🙏🏻 pic.twitter.com/PX6oAnRhNm
— Prashant Kumar (@scribe_prashant) June 12, 2025
काय म्हणाले सी. आर पाटील?
“आमचे नेते, माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात होते. या विमानातून ते प्रवास करत होते, या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.”
लंडनला का चालले होते गुजरातचे माजी मुख्यमंत्री?
विजय रूपाणी का चालले होते लंडनला?
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी हे अहमदाबादवरून लंडनला चालले होते. विजय रूपाणी यांची पत्नी लंडनला असल्याचे समजते आहे. विजय रूपाणी हे आपल्या पत्नीला लंडनवरून आणण्यासाठी चालले होते. विजय रूपाणी यांची पत्नी गेल्या काही महिन्यांपासून लंडनमध्ये असल्याचे समजते आहे. पत्नीला आणण्यासाठी रूपाणी चालले होते. ते ज्या विमानाने लंडनला चालले होते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विजय रूपाणी हे सीट नंबर ‘2 डी’ वर बसले होते असे सांगितले जात आहे. मात्र याबाबत खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही.
अहमदाबाद विमान दुर्घटनेत सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू
अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. हे प्रवासी विमान मेघानीनगर या रहिवाशी परिसरात कोसळले आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अहमदाबादच्या पोलिस आयुक्तांनी याबाबतची माहिती एका वृत्तसंस्थेला दिली आहे. सर्वच्या सर्व प्रवासी यांच्या मृत्यू झाला आहे.
आज दुपारच्या सुमारास अहमदाबाद वरून लंडनला जाणारे विमान हे मेघानीनगर भागात कोसळले. अहमदाबादच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले. यामध्ये 15 डॉक्टर देखील जखमी झाले आहेत. दरम्यान अहमदाबादच्या पोलिस आयुक्त यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, या विमानातील प्रवास करणारे सर्व प्रवाशी मृत्युमुखी पडले आहेत.