राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अहमदाबाद विमान अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
अहमदबाद : गुजरातमधील अहमदबादमध्ये भीषण अपघात झाला आहे. एअर इंडियाच्या या प्रवाशी विमानाचा टेक ऑफ होताच अवघ्या काही मिनिटांमध्ये अपघात झाला. उड्डाणानंतर फ्लाइट AI171 याचा अवघ्या काही मिनिटांमध्ये अपघात झाला आहे. या अपघातामध्ये मृतांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय नेते देखील लक्ष ठेवून आहेत. सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एअर इंडियाचे 242 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान एका रुग्णालयावर कोसळले आहे. अपघातग्रस्त प्रवाशांमध्ये भारतीय, ब्रिटीश आणि पोर्तुगाल नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये 169 भारतीय तर 53 ब्रिटिश नागरिक प्रवाशांमध्ये असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक विमानात अधिकृत माहिती एअर इंडियाने दिली आहे. त्याचबरोबर विमानाने 12 क्रू मेंबर देखील होते. याचबरोबर रुग्णालयावर हे विमान कोसळल्यामुळे 20 डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ही दुर्घटना झाल्यानंतर सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तातड़ीने हालचाली केल्या आहेत. अहमदाबाद विमान अपघातानंतर नवी दिल्ली येथे नागरी उड्डाण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी आपत्कालीन बैठकी घेतली. ज्यामध्ये या घटनेचा आढावा घेतला असून घटनास्थळी सुरू असलेल्या मदत कार्यावरही चर्चा केली. यावेळी आवश्यक ती सर्व मदत व उपाययोजना करण्याचे ठरवण्यात आले.
अहमदाबाद विमान दुर्घटना के बाद नई दिल्ली में नागरिक उड्डयन मंत्रालय के वरिष्ठ अधिकारियों के साथ एक आपातकालीन बैठक की गई । जिसमें इस घटना की समीक्षा की गई। घटनास्थल पर राहत कार्य पर भी चर्चा की।@narendramodi @PMOIndia @AmitShah @RamMNK @MoCA_GoI pic.twitter.com/EO6XOekkTW
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 12, 2025
त्याचबरोबर मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी संवाद साधून सामान्य नागरिकांना आवाहन देखील केले आहे. सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, काही वेळापूर्वी दुपारच्या सुमारास विमान अपघाताची दुर्दैवी घटना घडली. एअर इंडियाचे 171 हे अहमदाबादहून लंडनला जायला निघालेले विमान कोसळले. अपघात झालेल्या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. आमच्या मंत्रालयामध्ये देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. गृहमंत्री अमित शाह आणि मंत्री राममोहन नायडू तिथे पोहचले आहेत. मी पण तिथेच जात आहे. जे लोक तिथे अडकले आहेत किंवा जखमी आहेत त्यांना तातडीने बाहेर काढून मदत करणे हीच आमची प्राथमिकता आहे, असे मत खासदार व राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, तेथील राज्य सरकार हे बचावकार्य करत आहे. मंत्रालय त्यांच्यासोबत संवाद ठेवून आहे. तसेच या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह हे लक्ष ठेवून आहेत. अहमदाबाद एअरपोर्टवर हेल्पलाईन नंबर सुद्धा सुरु केला आहे. तसेच दिल्ली एअर लाईनने देखील हेल्पलाईन सुरु केली आहे, अशी माहिती राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.