Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gujarat Cabinet Expansion: गुजरातमध्ये एवढी मोठी राजकीय उलथापालथ का? ‘मिनी-असेंब्ली’साठी ‘ भाजपचा मोदी फॉर्म्युला’

गुजरातमध्ये राजकीय उलथापालथ ही काही नवीन गोष्ट नाही. सत्ताविरोधी लाटेचा सामना करण्यासाठी भाजपने यापूर्वीही त्यांच्या राजकीय फेरबदलांच्या फॉर्म्युल्याचा वापर केला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 17, 2025 | 04:47 PM
Gujarat Cabinet Expansion:

Gujarat Cabinet Expansion:

Follow Us
Close
Follow Us:
  • गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता त्यांच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे
  • सत्ताविरोधी लाटेचा सामना करण्यासाठी भाजपची रणनीती
  • ही रणनीतीआतापर्यंत भाजपसाठी यशस्वी ठरली

Gujarat Politics: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये एक मोठी राजकीय खेळी केली आहे, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता त्यांच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारण्यात आले. गुरुवारी संध्याकाळी भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात संभाव्य फेरबदल आणि विस्ताराच्या तयारीसाठी एकूण १६ मंत्र्यांनी आपले राजीनामे सादर केले.

गुजरातमध्ये राजकीय उलथापालथ ही काही नवीन गोष्ट नाही. सत्ताविरोधी लाटेचा सामना करण्यासाठी भाजपने यापूर्वीही त्यांच्या राजकीय फेरबदलांच्या फॉर्म्युल्याचा वापर केला आहे. २०२१ मध्ये, पक्षाने ‘नो रिपीट थिअरी’ अंतर्गत संपूर्ण मंत्रिमंडळ बदलण्यत  आले होते,  त्या काळातील मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा कार्यकाळ संपवला होता.

ऐतिहासिक क्षण! नाशिकमध्ये ‘तेजस MK-1A’ लढाऊ विमानाचे पहिले उड्डाण यशस्वी, राजनाथ सिंहांनी व्यक्त केला आनंद

ही रणनीती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणाचा एक भाग आहे, जी आतापर्यंत भाजपसाठी यशस्वी ठरली आहे. २०२१ मध्ये रुपानी सरकार हटवल्यानंतर विरोधकांनी टीका केली, पण भाजपने जनतेसमोर हे यशस्वीपणे मांडले की पंतप्रधान मोदींनी धाडसी आणि ठोस निर्णय घेतला आहे.

गुजरातमध्ये एवढी मोठी प्रयोगाचे कारण काय?

मुख्यमंत्री असतानाही, नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये ” नो रिपीट थेअरी” आणि चेहरा बदलण्याच्या धोरणांचा अनेक वेळा प्रयोग केला होता. कोविडनंतरही, संपूर्ण सरकार एकाच झटक्यात बदलण्यात आले आणि एका वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपने १८२ पैकी १५६ जागा जिंकल्या, जो गुजरातच्या निवडणूक इतिहासातील सर्वात मोठ्या विजयांपैकी एक मानला जातो. त्या निवडणुकीत “नरेंद्र-भूपेंद्र” हा नारा खूप लोकप्रिय झाला होता. पण गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दोन वर्षांपूर्वीच गुजरातच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यामागे अनेक कारणे आहेत.

काही मंत्री सक्रिय भूमिका बजावण्यासाठी खूप वयस्कर होते, तर अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते. यामध्ये बच्चूभाई खाबड, भिखू सिंग परमार आणि मुकेश पटेल यांचा समावेश होता. जर पक्षाने मंत्र्यांना एकेक करून काढले असते, तर विरोधकांना राजकीय फायदा मिळू शकला असता. त्यामुळे भाजपने सर्व मंत्र्यांचे राजीनामे एकाच झटक्यात स्वीकारले आणि हा प्रश्न वाढण्याआधीच शांत केला.

Horror Story: हे ‘ते’ जग नव्हे! ८ किमीच्या प्रवासात फक्त ३ जणांची चाहूल… ‘ती’ कोण होती? याचा सुगावा नाही

गुजरात मंत्रिमंडळात नव्याने फेरबदल

या फेरबदलाचा प्राथमिक उद्देश महानगरपालिका निवडणुका आहेत, ज्या “मिनी-विधानसभा निवडणुका” मानल्या जात आहेत. जुनागढ आणि गांधीनगर वगळता अहमदाबाद, सुरत, वडोदरा आणि राजकोटसह अनेक शहरांमध्ये निवडणुका होणार आहेत. शहरी मतदारांमध्ये ते अधिक मजबूत झाले आहे हे जाणून भाजप या भागात कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही.

रविवारी पंतप्रधान मोदींसोबत नवी दिल्लीत झालेल्या राज्य नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय अंतिम करण्यात आला. भाजपने राज्य संघटनेतही बदल केले आहेत, ज्यात पूर्वी सहकार मंत्री असलेले सीआर पाटील यांच्या जागी जगदीश विश्वकर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सौराष्ट्र आणि आदिवासी भागांवर भाजपची नजर

आम आदमी पक्षाच्या (आप) वाढत्या हालचालींमुळे, विशेषतः सौराष्ट्र आणि आदिवासी पट्ट्यात, भाजपची चिंता वाढली आहे. ‘आप’ने अलिकडेच विसावदरची जागा जिंकली असून, राज्यातील त्यांच्या सक्रिय उपस्थितीची पावती मिळाली आहे.

विधानसभेतील आदिवासी आरक्षित २७ जागांवर ‘आप’चा प्रभाव वाढल्यामुळे भाजपसाठी धोका निर्माण झाला आहे. आदिवासी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप उपमुख्यमंत्रीपदाचा वापर करू शकतो, तर सौराष्ट्रातील असंतोष शांत करण्यासाठी लेउवा पटेल आमदारांना कॅबिनेटमध्ये स्थान देण्याची शक्यता आहे.

याशिवाय, भाजप तरुण नेतृत्वावर भर देत आहे. नव्या पिढीतील चेहरे मंत्रिमंडळात समाविष्ट करून, पक्ष जनरल झेडला संदेश देऊ इच्छितो की बदलासाठी तयार असून नेतृत्वात तरुणांना संधी दिली जात आहे.

आता सर्वांच्या नजरा येणाऱ्या निवडणुकीकडे लागल्या आहेत की, कोणते नवीन चेहरे उदयास येतात आणि या राजकीय शस्त्रक्रियेतून भाजपला कितपत फायदा होतो.

Web Title: Gujarat cabinet expansion why such a big political upheaval in gujarat bjps modi formula for mini assembly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 04:43 PM

Topics:  

  • Amit Shah
  • BJP
  • Gujrat Politics

संबंधित बातम्या

इन्कमिंगमुळे भाजपचं टेन्शन वाढलं; पक्षातील इच्छुकांची धाकधूक; पुण्यात नेमकं काय घडतंय?
1

इन्कमिंगमुळे भाजपचं टेन्शन वाढलं; पक्षातील इच्छुकांची धाकधूक; पुण्यात नेमकं काय घडतंय?

Gujarat Politics : गुजरातचे नवीन मंत्रिमंडळ कसे असू शकते? कोणत्या मंत्र्यांना मिळू शकते स्थान?
2

Gujarat Politics : गुजरातचे नवीन मंत्रिमंडळ कसे असू शकते? कोणत्या मंत्र्यांना मिळू शकते स्थान?

Shivajirao Kardile : सर्वसामान्यांचा नेता हरपला ! सामान्य दूधवाला ते आमदार, राज्यमंत्री झाले,  कोण होते शिवाजीराव कार्डिले?
3

Shivajirao Kardile : सर्वसामान्यांचा नेता हरपला ! सामान्य दूधवाला ते आमदार, राज्यमंत्री झाले, कोण होते शिवाजीराव कार्डिले?

फरार गुन्हेगारांसाठी परत आणण्यासाठी कठोर उपाययोजना! गृहमंत्री अमित शहांचे ‘विशेष तुरुंग’ आणि पासपोर्ट रद्द करण्यावर भर
4

फरार गुन्हेगारांसाठी परत आणण्यासाठी कठोर उपाययोजना! गृहमंत्री अमित शहांचे ‘विशेष तुरुंग’ आणि पासपोर्ट रद्द करण्यावर भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.