ऐतिहासिक क्षण! नाशिकमध्ये 'तेजस MK-1A' लढाऊ विमानाचे पहिले उड्डाण यशस्वी (Photo Credit- X)
Rajnath Singh in Nashik: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी आज (गुरुवारी) नाशिकमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (HAL) नवीन उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले आणि याचसोबत तेजस LCA MK-1A या लढाऊ विमानाचे पहिले ऐतिहासिक उड्डाण पाहिले. राजनाथ सिंह यांनी LCA MK-1A साठीची तिसरी उत्पादन लाइन आणि HTT-४० विमानासाठीची दुसरी उत्पादन लाइन राष्ट्राला समर्पित केली. या उत्पादनांमुळे भारतीय हवाई दलाची (Indian Air Force – IAF) एकूण ताकद आणि क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
उद्घाटन समारंभात बोलताना राजनाथ सिंह भावूक झाले. ते म्हणाले, “नाशिकची ही भूमी केवळ श्रद्धेचे प्रतीक नाही, तर स्वावलंबी भारत आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. आज, जेव्हा मी नाशिक विभागात उत्पादित सुखोई-३०, एलसीए (LCA) आणि एचटीटी-४० विमानांचे उड्डाण पाहिले, तेव्हा माझी छाती अभिमानाने फुलून आली. त्या विमानांचे उड्डाण संरक्षण क्षेत्रात भारताच्या ‘स्वावलंबनाच्या उड्डाणाचे’ प्रतिनिधित्व करते.”
पिछले छह दशकों से अधिक समय से HAL नासिक भारत की रक्षा विनिर्माण शक्ति का मज़बूत स्तंभ रहा है। कभी यहाँ MiG-21 और MiG-27 जैसे विमानों का निर्माण होता था, आज यह सुखोई-30 और तेजस जैसे आधुनिक विमानों का भी निर्माण कर रहा है। pic.twitter.com/CKPA8TdNFY — Rajnath Singh (@rajnathsingh) October 17, 2025
Rajnth Singh: ‘देशातील युवकांकडे कौशल्य असेल तर…”; काय म्हणाले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह?
संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, आपण परदेशातून ज्या वस्तू खरेदी करायचो, त्याच वस्तू आता आपण देशात तयार करत आहोत. लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, इंजिन आणि इलेक्ट्रॉनिक प्रणाली या सर्व क्षेत्रांत भारताने मोठी प्रगती केली आहे. “आज, आपण अंतराळातही आपले स्थान मजबूत केले आहे,” असे ते म्हणाले. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत एरोस्पेस उपकरणांच्या स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला गेला आहे.
तेजस LCA MK1A हे भारतीय हवाई दलाच्या जुन्या MiG-21 विमानांची जागा घेण्यासाठी डिझाइन केलेले एक अधिक प्रगत, बहु-भूमिका (Multi-Role) लढाऊ विमान आहे.
‘PoK हा भारतातच….,’ भारतीय संरक्षण मंत्र्यांचा मोरोक्कोच्या भूमीवरुन पाकिस्तानला कडक इशारा