गुजरात : पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी मंगळवारी काँग्रेसवर (Congress) गंभीर आरोप केले. काँग्रेस पक्ष लोकांच्या भावना दुखावतो. तसेच हिंदू धर्माच्या श्रद्धेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, असे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. गुजरात (Gujrat) काँग्रेसच्या एका नेत्याच्या वक्तव्यावरही त्यांनी आक्षेप घेतला आहे.
मैं कांग्रेस और उसके नेताओं से पूछना चाहता हूँ की आपको भगवान श्री राम से क्या दुश्मनी हैं ? हिंदुओ से क्यों इतनी नफरत ? सदियों बाद अयोध्या में भगवान श्री राम का मंदिर भी बन रहा है फिर भी कांग्रेस के नेता भगवान श्री राम के ख़िलाफ़ अनाप-शनाप बयान देते रहते हैं।
— Hardik Patel (@HardikPatel_) May 24, 2022
[read_also content=”जस्टिन बिबर भारतात येणार, १८ ऑक्टोबरला दिल्लीत लाईव्ह कॉन्सर्ट https://www.navarashtra.com/entertainment/justin-bieber-live-concert-in-delhi-on-18th-october-nrsr-284257/”]
“मी यापूर्वीही म्हटले होते की, काँग्रेस पक्ष जनतेच्या भावना दुखावण्याचे काम करतो, हिंदू धर्माच्या श्रद्धेला तडा देण्याचा प्रयत्न करतो. आज माजी केंद्रीय मंत्री आणि गुजरात काँग्रेसच्या नेत्याने राम मंदिराच्या विटांवर कुत्रे लघवी करतात असे विधान केले! मला काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांना विचारायचे आहे की, भगवान श्रीरामाशी तुमचे काय वैर आहे? तुम्ही हिंदूंचा इतका द्वेष का करता? शतकांनंतर अयोध्येत भगवान श्रीरामाचे मंदिर बांधले जात आहे, तरीही काँग्रेसचे नेते प्रभू श्रीरामाच्या विरोधात वक्तव्ये करत आहेत,” असे हार्दिक पटेल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
हार्दिक पटेल यांनी १८ मे रोजी काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. हार्दिक पटेल काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याचे संकेत गेल्या अनेक महिन्यांपासून मिळत होते.