Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Arvind Kejriwal: यमुनेत विष मिसळल्याचे वक्तव्य भोवलं; केजरीवालांच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने दिले ‘हे’ निर्देश

Delhi Assembly Election : प्रचारादरम्यान केजरीवाल यांनी यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा गंभीर आरोप केला होता. या वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होताना पहायला मिळत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 29, 2025 | 10:07 PM
Arvind Kejriwal: यमुनेत विष मिसळल्याचे वक्तव्य भोवलं; केजरीवालांच्या अडचणी वाढल्या, हरयाणा कोर्टाने दिले 'हे' निर्देश

Arvind Kejriwal: यमुनेत विष मिसळल्याचे वक्तव्य भोवलं; केजरीवालांच्या अडचणी वाढल्या, हरयाणा कोर्टाने दिले 'हे' निर्देश

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार शिगेला पोहोचला आहे. 5 तारखेला मतदान आणि 8 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. मात्र माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होताना पहायला मिळत आहे. प्रचारादरम्यान केजरीवाल यांनी यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा गंभीर आरोप केला होता. हा आरोप आता त्यांना भोवण्याची शक्यता आहे. हरियाणा सरकारने केजरीवालांविरोधात खटला दाखल केला आहे. या प्रकरणात सोनीपत कोर्टाने केजरीवाल यांना नोटिस धाडली आहे.

काय म्हणाले होते अरविंद केजरीवाल? 

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाच्या भाजप सरकारने यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केला होता. त्यांनी म्हटले होते की हरियाणाचे पाणी यमुनेतून दिल्लीला येते. भाजपच्या हरियाणा सरकारने यमुनेचे पाणी विषारी बनवले आहे. तथापि, दिल्ली जल बोर्डाने ते पाणी दिल्लीत येण्यापासून रोखले. भाजप सरकारने पाण्यात असे विष मिसळले आहे, जे जलशुद्धीकरण केंद्रांनीही स्वच्छ करता येत नाही. यामुळे दिल्लीच्या एक तृतीयांश भागात पाण्याची कमतरता आहे.

हरयाणा सरकारची भूमिका काय? 

अरविंद केजरीवाल यांनी असे गंभीर आरोप केल्यानंतर हरयाणा सरकार देखील आक्रमक झाले आहे. हरयाणा राज्य आपत्ती व्यवस्थापनाने अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध सोनीपत कोर्टात खटला दाखल केला आहे. कोर्टाने राज्य सरकारची याचिका स्वीकारली आहे. याचिका स्वीकार केल्यानंतर कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना नोटिस पाठवली आहे. 17 फेब्रुवारी रोजी अरविंद केजरीवाल यांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा: ऐन निवडणुकीत अरविंद केजरीवाल अडचणीत; हरियाणा सरकार खटला दाखल करणार, मोठं कारण आलं समोर

नरेंद्र मोदींची केजरीवाल यांच्यावर टीका

अरविंद केजरीवाल यांच्या यमुना नदीत विष मिसळण्याच्या वक्तव्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला  व दिल्लीत राहणाऱ्या सर्व न्यायाधीशांना मारण्यासाठी आपले हरियाणातील बांधव यमुनेच्या पाण्यात विष मिसळतील का?” असा सवाल उपस्थित केला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणातील लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भितीने ते बिथरले आहेत. मला विचारायचं आहे की हरियाणाचे लोक त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या पाण्यात विष मिसळतील का? मोदी व देशातील सर्व न्यायाधीश, जगभरातील विविध देशांच्या दूतावासातील अधिकारी तेच पाणी पितात. हरियाणातील लोक मोदी व न्यायाधीशांना मारण्यासाठी त्यांच्या पाण्यात विषय मिसळतायत असं केजरीवाल म्हणत आहेत. मुळात असा विचार तरी कोणी करू शकतं का?” असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा: Delhi Assembly Election : “मला व दिल्लीतील न्यायाधिशांना मारण्यासाठी…”; पंतप्रधान मोदींचा अरविंद केजरीवालांना रोखठोक सवाल

पुढे मोदी म्हणाले की, “आम आदमी पार्टी व अरविंद केजरीवालांनी केवळ हरियाणातील नव्हे तर संपूर्ण देशातील जनतेचा अपमान केला आहे. एखाद्याची चूकभूल माफ करणं ही आपली संस्कृती आहे. परंतु, कोणी जाणून बुजून चुका करत असेल, देशालाच अपमानित करत असेल तर देश त्याला कधीच माफ करत नाही. हरियाणाचे लोक देशभक्त आणि धार्मिक आहेत. केजरीवालांच्या वक्तव्याने हरियाणातील लोकांचा अपमान झाला आहे, त्याचबरोर त्यांनी संपूर्ण देशातील जनतेचा अपमान केला आहे. हा आपल्या संस्कृतीचा अपमान आहे,” असा घणाघात पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.

Web Title: Haryana sonipat court sent summons to arvind kejriwal yamuna water poison statement delhi assembly election 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2025 | 09:58 PM

Topics:  

  • Arvind kejriwal
  • Delhi Assembly Election
  • Yamuna water

संबंधित बातम्या

Arvind Kejriwal : ‘दिल्लीपासून बिहारपर्यंत …’, अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा; निवडणुकांच्या तोंडावर इंडिया आघाडीला धक्का
1

Arvind Kejriwal : ‘दिल्लीपासून बिहारपर्यंत …’, अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा; निवडणुकांच्या तोंडावर इंडिया आघाडीला धक्का

पोटनिवडणुकीच्या निकालांनी ‘आप’चे वाढवले मनोबल; पुन्हा विजयाकडे वाटचाल करण्याच्या तयारीत
2

पोटनिवडणुकीच्या निकालांनी ‘आप’चे वाढवले मनोबल; पुन्हा विजयाकडे वाटचाल करण्याच्या तयारीत

“भाजपच्या मांडीवर कॉंग्रेस बसलाय….धोकेबाज पक्ष; अरविंद केजरीवाल नेमके भडकले का?
3

“भाजपच्या मांडीवर कॉंग्रेस बसलाय….धोकेबाज पक्ष; अरविंद केजरीवाल नेमके भडकले का?

‘मी राज्यसभेत जाणार…’, लुधियाना पोटनिवडणुकीत ‘आप’च्या विजयानंतर अरविंद केजरीवाल पुन्हा राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार?
4

‘मी राज्यसभेत जाणार…’, लुधियाना पोटनिवडणुकीत ‘आप’च्या विजयानंतर अरविंद केजरीवाल पुन्हा राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.