Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Himanta Biswa Sarma Oath: हिमंता बिस्वा सरमा पुन्हा आसामच्या गादीवर; सलग दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Himanta Biswa Sarma Oath: राजकीय विश्लेषकांच्या मते, ईशान्य भारतात भाजपचा झपाट्याने वाढणारा प्रभाव हा हिमंता बिस्वा शर्मा यांच्या धोरणाचा एक प्रमुख घटक होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 12, 2026 | 01:55 PM
Himanta Biswa Sarma, Assam CM, BJP Assam, PM Narendra Modi, Guwahati, Swearing-in Ceremony,

Himanta Biswa Sarma, Assam CM, BJP Assam, PM Narendra Modi, Guwahati, Swearing-in Ceremony,

Follow Us
Close
Follow Us:
  • हिमंता बिस्वा सरमा हे आसामचे सलग दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणारे पहिले बिगर काँग्रेसी नेते
  • आसाममध्ये एनडीए सरकारचा हा सलग तिसरा कार्यकाळ आहे (२०१६, २०२१ आणि आता २०२६)
  • सरमांसोबतच रामेश्वर तेली, अतुल बोरा, चरण बोरो आणि अजंता निओग यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली
 

Himanta Biswa Sarma Oath: आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मोठ्या विजयानंतर, हिमंता बिस्वा सरमा यांनी मंगळवारी (१२ मे) दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. हिमांता बिस्वा सरमा हे आसामचे सलग दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणारे पहिले बिगर काँग्रेसी नेते ठरले आहेत. आसामची राजधानी गुवाहाटी येथे आयोजित भव्य शपथविधी सोहळ्यात राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनियतेची शपथ दिली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपशासित अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रीही उपस्थित होते.

एनडीए विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर राज्यपालांनी रविवारी (१० मे) त्यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली होती. आसाममधील एनडीए सरकारचा हा सलग तिसरा कार्यकाळ आहे. यापूर्वी, २०१६ मध्ये सरबानंद सोनोवाल भाजपच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तर २०२१ मध्ये हिमंता बिस्वा सरमा यांनी पदभार स्वीकारला.

Assam CM Oath : सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हिमंता बिस्व सरमा; गुवाहाटीत समारंभाची तयारी सुरु

पाच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळानंतर आज हिमांता बिस्वा सरमा यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा अत्यंत विशेष मानला गेला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह एनडीए-शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. हिमंता बिस्वा सरमा यांच्यासोबत रामेश्वर तेली, अतुल बोरा, चरण बोरो (BPF)आणि अजंता निओग या चार नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

हिमंता बिस्वा सरमा यांचा राजकीय प्रवास

हिमंता बिस्वा सरमा यांनी २०१५ मध्ये काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी आसाममध्ये काँग्रेसचे वर्चस्व होते आणि भाजपचे फक्त पाच आमदार होते. हिमंता शर्मा यांनी ईशान्य भारतात भाजपला मजबूत करण्यासाठी धोरणात्मक काम केले. २०१६ मध्ये, भाजपने त्यांची ईशान्य लोकशाही आघाडीचे (NEDA) संयोजक म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर, त्यांनी ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्षांना भाजपसोबत एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

PM Modi on Work From Home : नरेंद्र मोदींकडून ‘वर्क-फ्रॉम-होम’ चे आवाहन!काटकसर की संकटाची चाहूल?

राजकीय विश्लेषकांच्या मते, ईशान्य भारतात भाजपचा झपाट्याने वाढणारा प्रभाव हा हिमंता बिस्वा शर्मा यांच्या धोरणाचा एक प्रमुख घटक होता. शर्मा यांचे शिक्षण गुवाहाटीमध्ये झाले आणि त्यांनी कामरूप अकादमीमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी कॉटन कॉलेजमधून राज्यशास्त्रात बीए आणि एमए, नंतर गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून एलएलबीची पदवी मिळवली आणि गुवाहाटी उच्च न्यायालयात काही काळ वकिली केली.

विद्यार्थी दशेतून राजकीय प्रवासाची सुरूवात

२००६ मध्ये, त्यांनी गुवाहाटी विद्यापीठातून पीएचडी पदवी प्राप्त केली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात विद्यार्थी राजकारणातून झाली. १९९१-९२ मध्ये, त्यांनी कॉटन कॉलेज स्टुडंट्स युनियनचे सरचिटणीस म्हणून काम केले आणि नंतर ते ऑल आसाम स्टुडंट्स युनियनमध्ये (AASU) सामील झाले. १९९० च्या दशकात ते काँग्रेस पक्षात सामील झाले आणि २००१ मध्ये जलुकबारी मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. विशेष म्हणजे, तेव्हापासून त्यांनी ही जागा सातत्याने जिंकली आहे.

 

Web Title: Himanta biswa sarma sworn in as chief minister of assam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • Assam CM
  • Himanta Biswa Sarma

संबंधित बातम्या

Assam CM Oath : सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हिमंता बिस्व सरमा; गुवाहाटीत समारंभाची तयारी सुरु
1

Assam CM Oath : सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हिमंता बिस्व सरमा; गुवाहाटीत समारंभाची तयारी सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.