home ministry Amit Shah on Jagdeep Dhankhar Resignation of vice president elections news
Amit Shah on Jagdeep Dhankhar Resignation : नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला. जगदीप धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. भाजपमधील अंतर्गत कलहामुळे जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. यावरुन जोरदार गदारोळ झाल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याचे आणि तब्यतीचे कारण देत राजीनामा दिला. 25 ऑगस्ट रोजी धनखड यांनी राजीनामा दिला. यानंतर जगदीप धनखड हे माध्यमांसमोर आले नसल्यामुळे त्यांना नजरकैद करण्यात आले आहे असा देखील आरोप विरोधकांनी केला आहे. या सर्व आरोपांवर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी भाष्य केले आहे. अमित शाह यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी अनेक राजकीय पत्ते उलघडले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री अमित शाह यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी जगदीप धनखड यांनी राजीनाम्यावर भाष्य केले. अमित शाह म्हणाले की, ‘धनखड साहेबांचा राजीनामा स्वतःहून स्पष्ट आहे. त्यांनी त्यांच्या राजीनाम्यामागे आरोग्यविषयक कारणे दिली आहेत. त्यांनी पंतप्रधान आणि इतर मंत्री आणि सरकारमधील सदस्यांचे त्यांच्या चांगल्या कार्यकाळाबद्दल मनापासून आभारही व्यक्त केले आहेत.’ असे मत अमित शाह यांनी व्यक्त केले आहे.
जगदीप धनखड यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे का?
जगदीप धनखड यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा विरोधकांनी दावा केला आहे. या दाव्यांबद्दल अमित शहा यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की सत्य आणि खोटेपणाचा अर्थ केवळ विरोधकांच्या विधानांवर अवलंबून राहू नये आणि माजी उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यावरून गोंधळ निर्माण करण्याविरुद्ध इशारा दिला.
अमित शहा म्हणाले, ‘असे दिसते की सत्य आणि खोटेपणाचा तुमचा अर्थ विरोधकांच्या विधानांवर आधारित आहे. आपण या सर्व गोष्टींवर गोंधळ घालू नये. जगदीप धनखड हे संवैधानिक पदावर होते आणि त्यांनी संविधानानुसार आपली कर्तव्ये पार पाडली. वैयक्तिक आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला. या मुद्द्यावर जास्त चर्चा होऊ नये.’ असे स्पष्ट मत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विरोधकांना खटकत आहे जगदीप धनखड यांचे मौन
विरोधकांनी जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांचे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यात सरकारने धनखड यांना गप्प केल्याचा दावा करण्यात आला होता. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यासोबतच त्यांना गप्प करण्याची चर्चा सुरू झाली आहे.