India Rain Alert: परतीच्या पावसाचा देशभरात अक्षरशः धुमाकूळ; पुढचे काही तास...; IMD चा इशारा काय?
देशभरात पावसाचा जोर वाढला
पर्वतीय राज्यांमध्ये मुसळधार पाऊस
महाराष्ट्राला दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
India Weather Update: देशभरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. अनेक राज्यांना पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासाह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने आज कुठे कुठे पावसाचा इशारा दिला आहे, ते जाणून घेऊयात.
मागच्या 24 तासांमध्ये देशातील हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड राज्यांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. तेलंगणा, गोवा, आसाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, आणि दक्षिणेकडील काही राज्यात मुसळधार पाऊस झाला. मात्र आज राजधानी दिल्लीत वातावरण मोकळे असण्याचा अंदाज आहे.
उत्तर प्रदेशमध्ये देखील आज पावसाची शक्यता नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसून येत आहे. अनेक नद्यांची पाणीपातळी देखील कमी झाली आहे. मात्र बिहार राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या काही दिवसांत या दोन्ही राज्यात नैसर्गिक आपत्ती देखील आल्याचे पाहायला मिळाले. बागेश्वर, चंपावर, चमोली, पिठोरागड भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
District wise Nowcast Warning valid for next two-three hours:
Orange warnings: Thunderstorms & Lightning with gusty winds ( 40-60 kmph) and moderate rain (5-15 mm/h) very likely over following districts in:Meghalaya: East Jaintia Hills, East Khasi Hills
Maharashtra:… pic.twitter.com/scttkBEDOM— India Meteorological Department (@Indiametdept) September 15, 2025
महाराष्ट्रात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यातील अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. नागरिकांना सवधानतेचा इशारा देण्यात आला आहे. गरज असेल तर घराबाहेर पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Today Weather : पुढील तीन तास ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट; विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसामुळे प्रशासन ॲक्शन मोडवर
‘या’ राज्यांत होणार मुसळधार
मुंबईसह पुण्यामध्ये त्याचबरोबर पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. पुण्यामध्ये काही ठिकाणी काही ठिकाणी गजबजून वादळ, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि वेगवेगळ्या ठिकाणी (३०-४० किमी प्रतितास) वेगाने वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.