पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले असून हवामान विभागाने मुंबई, पुणे, ठाणे आणि पावघरला ऑरेंज अलर्ट दिला आहे (फोटो - सोशल मीडिया)
Mumbai Pune Orange Alert : पुणे : पावसाचा परती प्रवास सुरु झाला असून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह पुण्यामध्ये आणि राज्यातील विविध भागांमध्ये काल सायंकाळपासून तुफान पाऊस बरसला आहे. रात्रभर मुसळधार पाऊस झाला असून अजूनही राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार सुरु आहे. यामुळे आता भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अंदाज दिला असून पुढील तीन तास अत्यंत धोक्याची घंटा असल्याचे सूचवले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील काही तासांत वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच ताशी ३०-४० किलोमीटर वेगाने जोरदार वारेही वाहू शकतात. या काळात लोकांना सतर्क राहण्याचा आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचबरोबर कामाव्यतिरिक्त बाहेर न पडण्याच्या सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. विविध विभाग हे एक्शन मोडमध्ये आले आहे. काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे स्थानिकांना सुरक्षित जागी स्थलांतरित केले जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुंबई शहराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. बीएमसीने हवामान अंदाजात शहर आणि उपनगरात काही ठिकाणी ढगाळ आकाश आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. यासोबतच, ३०-४० किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्यासह वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईला हवामान विभागाक़डून रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह विजांचा कडकडाट आणि सोसाळ वाऱ्यासह विजांचा कडकडा होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
मुंबईसह पुण्यामध्ये त्याचबरोबर पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. पुण्यामध्ये काही ठिकाणी काही ठिकाणी गजबजून वादळ, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि वेगवेगळ्या ठिकाणी (३०-४० किमी प्रतितास) वेगाने वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. या प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने, पिकलेल्या पिकांची कापणी करावी. फळझाडे आणि भाज्यांना सांडपाण्यापासून रोखण्यासाठी आधार द्या. मळणी शक्य नसल्यास, कापणी केलेले धान्य योग्यरित्या झाकून ठेवावे. पावसापासून संरक्षणासाठी, साठवलेले धान्य सुरक्षित साठवणुकीत हलवावे. सिंचन आणि कोणत्याही प्रकारचे रासायनिक फवारणी टाळा. शेतातून जास्तीचे पावसाचे पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था करा. गुरांना गोठ्यात सुरक्षित ठिकाणी ठेवावे. वादळ आणि वीज पडण्याच्या वेळी शेतातील जनावरांना घरात ठेवावे, असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.