अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा (फोटो- istockphoto)
देशभरात पावसाचा जोर वाढणार
पुढील 72 तासांत अनेक राज्यात पावसाचा इशारा
हवामान विभागाने जारी केला अलर्ट
India Rain Weather Update: गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात पावसाचा जोर कमी झाल्याचे चित्र पहायला मिळत होते. मात्र आता भारतीय हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पंजाब, दिल्ली या राज्यांना पुराचा फटका देखील बसला. राजधानी दिल्लीत देखील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील 72 तास म्हणजे तीन दिवस देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राजधानी दिल्लीत दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र आता पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.
‘या’ राज्यांत होणार मुसळधार
भारतीय हवामान विभागाने 16 सप्टेंबरपर्यंत काही राज्यात मान्सून सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. पुढील 72 तासांमध्ये उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब आणि हरियाणा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थान, दिल्लीत हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. यावेळेत 30 ते 40 किमी प्रतीतास वेगाने वारे देखील वाहण्याची शक्यता आहे.
मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडीशा, झारखंड, महाराष्ट्र या राज्यात देखील मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. गोवा, पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील राज्यात देखील पासचा इशारा देण्यात आला आहे.
India Rain Alert: टाटा, बाय-बाय! ‘या’ राज्यांमध्ये वरूणराजा घेणार विश्रांती; मात्र मध्य भारतात…
महाराष्ट्रात देखील मुसळधार
महाराष्ट्रात देखील पुढील दोन ते टिन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बिहारमध्ये कसे असणार हवामान?
बिहारमध्ये देखील आज भारतीय हवामान विभगाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी वीज कोसळणे किंवा अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पूर्व आणि मध्य भारतातील बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, तर महाराष्ट्र, दक्षिण भारतात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रातील कोकण, मराठवाडा, पुणे भागात देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान हवामान विभागाने अनेक राज्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे.