नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. ९ मे रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले केले, जे भारतीय सशस्त्र दल आणि भारताच्या हवाई संरक्षण प्रणाली S-400 ने हाणून पाडले आणि ३ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली. पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने लाहोर, सियालकोट आणि इस्लामाबाद सारख्या प्रमुख पाकिस्तानी शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. भारतीय हल्ल्यात ३१ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ५७ जण जखमी झाले आहेत. यानंतर दोन्ही देशांमधील युद्धाची शक्यता आणखी वाढली आहे. असे प्रश्न उद्भवतात की जर उद्या युद्ध झाले तर भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणते देश कोणाचे समर्थन करतील आणि आतापर्यंत त्यांची भूमिका काय आहे, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.
चीन हा पाकिस्तानचा सर्वात चांगला मित्र मानला जातो. कारण इतिहासात भारताचे दोन्ही देशांशी संबंध फारसे चांगले राहिले नाहीत. परंतु भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या संघर्षात, चीनने दोन्ही देशांना पाठिंबा देण्याऐवजी संयम बाळगण्याचे आवाहन करून पाकिस्तानला आश्चर्यचकित केले आहे. तथापि, असे मानले जाते की चीन केवळ बाहेरून या संघर्षापासून दूर असल्याचे दाखवत आहे परंतु गुप्तपणे पाकिस्तानला मदत करत असल्याचेही आतापर्यंत दिसून आले आहे.
इराण आणि तुर्की हे आशियातील महत्त्वाचे देश आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची पाकिस्तानला भेट देत असताना, त्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचीही भेट घेतली. जयशंकर यांच्याशी फोनवर बोलल्यानंतर त्यांनी दोन्ही देशांनी संयम बाळगावा अशी मागणी केली. पण तुर्कीचे अध्यक्ष तैय्यप एर्दोगान यांनी या संघर्षात पाकिस्तानला पाठिंबा देणार असल्याचे संकेत दिले आहेत. खरं तर, ७ मे रोजी, जेव्हा भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानवर हवाई हल्ला केला आणि १०० दहशतवाद्यांना ठार मारले, तेव्हा एर्दोगानने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून आपले दुःख व्यक्त केले.
“आम्हाला काळजी आहे की क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव पूर्णपणे संघर्षात रूपांतरित होऊ शकतो, ज्यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांचे बळी जातील,” असे एर्दोगान यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. हल्ल्यात प्राण गमावलेल्या आपल्या बांधवांवर दया करण्यासाठी मी अल्लाहकडे प्रार्थना करतो आणि मी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बंधूभावाच्या लोकांप्रती आणि पाकिस्तानप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो, असं ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे तुर्कस्तान पाकिस्तानला पाठिंबा देणर असल्याचे म्हटले जाते.
पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या संघर्षाबाबत, अमेरिका, रशिया आणि युरोपियन युनियनने भारताला पाठिंबा देण्याबद्दल आणि दहशतवादाविरुद्ध लढण्याबद्दल बोलले आहे. अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली म्हणाल्या की, भारताला प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे. पाकिस्तानला स्वतःला बळी म्हणून सादर करण्याचा कोणताही अधिकार नाही.
त्याच वेळी, अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, :आपण भारतीयांना शस्त्रे ठेवण्यास सांगू शकत नाही आणि पाकिस्तानी लोकांकडूनही अशी अपेक्षा करू शकत नाही. आमचे एकमेव काम म्हणजे राजनैतिक मार्गाने चर्चा करणे आणि हा संघर्ष गंभीर होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणे.