Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Alliance -DMK Dispute: राजकीय भूकंप! ‘इंडिया’ आघाडीचा मुख्य आधारस्तंभ ढळला; मोठ्या पक्षाने थेट जाहीर केला बहिष्कार!

India Alliance -DMK Dispute: डीएमकेने आपल्या निवेदनात तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने केलेल्या कथित 'विश्वासघाताचा' उल्लेख केला आहे. या घडामोडींमुळे पक्षाचे कार्यकर्ते नाराज आणि दुखावले गेल्याचे सांगत, काँग्रेस उपस्थित असलेल्या बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याचे डीएमकेने स्पष्ट केले

  • By अनुराधा धावडे
Updated On: Jun 04, 2026 | 07:04 PM
MK Stalin vs Rahul Gandhi, Thalapathy Vijay TVK Impact, Delhi Opposition Meeting June 8, Tamil Nadu Politics

MK Stalin vs Rahul Gandhi, Thalapathy Vijay TVK Impact, Delhi Opposition Meeting June 8, Tamil Nadu Politics

Follow Us
Follow Us:

 

India Alliance -DMK Dispute: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टिव्हीके पक्षाला मिळालेल्या मोठ्या यशानंतर तेथील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. टिव्हीकेचे नेते आणि तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री थलपती विजय यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना व्यासपीठावर स्थान दिले. पण त्यानंतर तेथील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतील सर्व पक्षांची येत्या ८ जूनला दिल्लीत मोठी बैठक होणार आहे. आगामी बैठकीचे निमंत्रण दक्षिणेतील प्रमुख पक्ष असलेल्या द्रविड मुनेत्र कळघम यांच्या म्हणजेच Dravida Munnetra Kazhagam ला देखील देण्यात आले आहे. पण डिएमके ने या बैठकीला सहभागी होणार नसल्याची घोषणा केली आहे. काँग्रेसकडून झालेल्या कथित “विश्वासघातामुळे” हा निर्णय घेतल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.

Delimitation Plan: २०२९ च्या निवडणुकीत गेमचेंजर ठरणार? मोदी सरकारचा ‘हा’ मास्टरप्लॅन तयार; देशाचा राजकीय नकाशा बदलणार!

चेन्नई येथील पक्ष मुख्यालय अण्णा अरिवलयममधून जारी करण्यात आलेल्या निवेदनात डीएमकेने सांगितले की, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि राज्यांच्या अधिकारांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर पक्ष सातत्याने संघर्ष करत आला आहे. यामध्ये NEET परीक्षा, मतदारसंघ पुनर्रचना, मतदार याद्यांची विशेष सखोल पुनर्तपासणी (SIR), निवडणूक आयोगाचे कामकाज, ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ प्रस्ताव, वक्फ कायदा आणि परकीय योगदान नियमन कायद्यातील (FCRA) सुधारणा यांचा समावेश आहे.

इंडिया आघाडीच्या स्थापनेपासून डीएमके हा इंडिया आघाडीचा महत्त्वाचा आधारस्तंभ राहिला आहे. पक्षाध्यक्ष एम.के. स्टॅलिन ( M.K.Stalin) यांनी राष्ट्रीय पातळीवरील अनेक प्रश्नांवर आघाडीची भूमिका मजबूत करण्यासाठी पुढाकार घेतला होता.

काँग्रेसवर गंभीर आरोप

डीएमकेने आपल्या निवेदनात तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने केलेल्या कथित ‘विश्वासघाताचा’ उल्लेख केला आहे. या घडामोडींमुळे पक्षाचे कार्यकर्ते नाराज आणि दुखावले गेल्याचे सांगत, काँग्रेस उपस्थित असलेल्या बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याचे डीएमकेने स्पष्ट केले. त्याचवेळी बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा अर्थ राष्ट्रीय मुद्द्यांपासून माघार घेणे नसल्याचे पक्षाने नमूद केले आहे. नीट, वक्फ कायदा, एक राष्ट्र-एक निवडणूक आणि इतर जनहिताच्या विषयांवर आपला संघर्ष सुरूच राहील, तसेच राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर मित्रपक्षांना पाठिंबा देत राहू, असेही पक्षाने स्पष्ट केले.

India Rain Alert: पावसाची जोरदार हजेरी! 24 राज्यांत वादळी पावसाचा इशारा, हवामान विभागाचा मोठा अंदाज

 

राज्यसभा जागेवरून वाद वाढला

दरम्यान, सी. जोसेफ विजय यांच्या यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने तामिळनाडूमधील रिक्त राज्यसभा जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय काँग्रेससाठी मोठा राजकीय दिलासा मानला जात आहे. राज्यातील सरकारच्या स्थैर्यासाठी काँग्रेसचा पाठिंबा महत्त्वाचा असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. मात्र, या निर्णयावर डीएमकेने टीका केली आहे. पक्षाचे प्रवक्ते ए. सर्वानन यांनी निशाणा साधला आहे. संसदेत भाजपशी थेट संघर्ष टाळण्यासाठीच ही जागा काँग्रेसला देण्यात आली आहे. “टीव्हीकेला संसदेत भाजपविरोधात थेट भूमिका घ्यायची नाही, त्यामुळे ही जबाबदारी काँग्रेसवर सोपवण्यात आली आहे,” असा आरोप त्यांनी केला.

डीएमकेच्या या निर्णयामुळे इंडिया आघाडीसमोरील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले असून, आगामी राजकीय घडामोडींमध्ये या वादाचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: India alliance dispute dmk boycott congress tamil nadu politics 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 07:04 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.