Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंगणात सहज दिसणारे पक्षी आता नव्या पिढीला दिसेनासे झालेत! भारतातील ६०% पक्ष्यांची घट

काही दशकांपूर्वी घराच्या अंगणात आणि झाडांवर सहज दिसणारे पक्षी आता हळूहळू कमी होताना दिसत आहेत. भारतातील पक्ष्यांच्या संख्येबाबत समोर आलेल्या ताज्या अहवालाने पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा इशारा दिला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 24, 2026 | 10:27 AM
अंगणात सहज दिसणारे पक्षी आता नव्या पिढीला दिसेनासे झालेत! भारतातील ६०% पक्ष्यांची घट

अंगणात सहज दिसणारे पक्षी आता नव्या पिढीला दिसेनासे झालेत! भारतातील ६०% पक्ष्यांची घट

Follow Us
Follow Us:
  • भारतातील अनेक सामान्य पक्ष्यांच्या संख्येत दीर्घकालीन घट
  • शहरीकरण, प्रदूषण आणि अधिवासाच्या ऱ्हासाचा पक्ष्यांवर परिणाम
  • गिधाडे, शिकारी आणि स्थलांतरित पक्ष्यांना सर्वाधिक धोका
काही दशकांपूर्वी घराच्या अंगणात, शेताच्या बांधावर किंवा झाडांच्या फांद्यांवर सहज दिसणारे अनेक पक्षी आता नव्या पिढीसाठी जवळपास अपरिचित होत आहेत. ‘स्टेट ऑफ इंडियाज बर्डस’च्या ताज्या अहवालानुसार भारतातील सुमारे ३४८ पक्षीप्रजातींच्या अभ्यासात ६० टक्के पक्ष्यांच्या संख्येत दीर्घकालीन घट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे दुर्मीळ पक्ष्यांपेक्षा पूर्वी सर्वसामान्य मानल्या जाणाऱ्या पक्ष्यांचे हळूहळू कमी होणे हा अधिक पर्यावरणीय इशारा ठरत आहे. अनेक पक्ष्यांची संख्या अचानक घटलेली नाही. ती इतक्या संथ गतीने कमी होत आहे. त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.

राम मंदिरातील दानचोरी प्रकरणातील ‘ते’ रहस्य अखेर उलगडले; SBI कर्मचाऱ्याने…

स्टेट ऑफ इंडियाज बर्डसचा अहवाल भारतातील ३४८ पक्षीप्रजातींच्या अभ्यासात ६० टक्क्यांची दीर्घकालीन घट

जे पक्षी दशकांपूर्वी आपल्या दैनंदिन परिसराचा भाग होते. आजची मुले त्या पक्ष्यांना पाहतच नाहीत. पक्ष्यांची घट केवळ एखाद्या दुर्मीळ प्रजातीपुरती मर्यादित नाही. घरची चिमणी, मैना, साळुंकी, दयाळ, घुबड आणि इतर सामान्य पक्ष्यांच्या अधिवासावरही शहरीकरणाचा परिणाम होत आहे. देशातील ९४२ पक्षीप्रजातीचे विश्लेषण करण्यात आले असून, त्यासाठी देशभरातील पक्षिनिरीक्षकांनी नोंदवलेल्या सुमारे ४.८ कोटी निरीक्षणांचा वापर करण्यात आला.

पक्ष्यांची संख्या घटण्याची कारणे काय आहेत?

पक्ष्यांच्या घटण्यामागे झाडांची आणि नैसर्गिक अधिवासांची कमी होत जाणारी संख्या, वाढते शहरीकरण, शेतीतील बदल, कीटकनाशकांचा वापर, प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेप यासारखे अनेक घटक असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
मानवी हस्तक्षेपाचा आणखी एक अनपेक्षित परिणाम समोर आला आहे. उत्तराखंडातील हिमालयीन मोनाल या पक्ष्यावर झालेल्या अभ्यासात मानवनिर्मित आवाज वाढलेल्या भागातील पक्षी इतरांपर्यंत आपला आवाज पोहोचवण्यासाठी अधिक तीव्र आवाज करतात, असे आढळले.

कोणत्या पक्ष्यांना सर्वाधिक धोका?

गिधाडे, शिकारी पक्षी, स्थलांतरित किनारी पक्षी आणि बदके यांच्यात मोठी घट दिसून आली. गवताळ प्रदेशातील पक्ष्यांची संख्याही विशेष वेगाने कमी झाली आहे. दीर्घ पल्ल्याचे स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत ५० टक्के पेक्षा अधिक घट, तर किनारी भागात येणाऱ्या काही स्थलांतरित पक्ष्यांच्या समूहात जवळपास ८० टक्के घट नोंदली गेली.

Train Accident : आंध्रात एक्सप्रेसच्या धडकेत चार विद्यार्थी दगावले, श्रीकाकुलममधील ह्रदयद्रावक घटना

होणारी घट चिंताजनक

मौर, आशियाई कोकीळ, राखाडी कबुतरे, राखाडी वटवट्या यांसारख्या काही परिचित पक्ष्यांच्या संख्येत वाढ किंवा स्थिरता दिसली. त्यामुळे चित्र असे आहे की सर्व पक्षी कमी होत नाहीत, परंतु पक्ष्यांच्या मोठ्या समूहामध्ये दीर्घकालीन घट चिंताजनक आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: India birds population decline state of indias birds report 60 percent birds long term decline

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • birds
  • India news
  • navarashtra news

संबंधित बातम्या

India CELAC Meeting: गेल्या दशकात भारताचा जीडीपी दुप्पट; S. Jaishankar यांनी CELAC परिषदेत मांडला प्रगतीचा आलेख
1

India CELAC Meeting: गेल्या दशकात भारताचा जीडीपी दुप्पट; S. Jaishankar यांनी CELAC परिषदेत मांडला प्रगतीचा आलेख

S. Jaishankar UNGA Speech: संयुक्त राष्ट्रांच्या 81 व्या महासभेत एस. जयशंकर मांडणार भारताची भक्कम भूमिका; ‘या’ दिवशी होणार भाषण
2

S. Jaishankar UNGA Speech: संयुक्त राष्ट्रांच्या 81 व्या महासभेत एस. जयशंकर मांडणार भारताची भक्कम भूमिका; ‘या’ दिवशी होणार भाषण

India Bangladesh : 101 करारांच्या आढाव्यावरून भारत संतप्त; बांगलादेशच्या बदलत्या भूमिकेवर दिल्लीची करडी नजर
3

India Bangladesh : 101 करारांच्या आढाव्यावरून भारत संतप्त; बांगलादेशच्या बदलत्या भूमिकेवर दिल्लीची करडी नजर

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
4

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.