Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Pakistan Politics: मुदत संपल्यानंतर पाकिस्तानी नागरिक भारतात सापडल्यास…; केंद्राचा थेट इशारा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना परत पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 28, 2025 | 09:58 AM
India-Pakistan Politics: मुदत संपल्यानंतर पाकिस्तानी नागरिक भारतात सापडल्यास…; केंद्राचा थेट इशारा
Follow Us
Close
Follow Us:

India-Pakistan Politics:  जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये  22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले असून, त्यासाठीची अंतिम मुदत आज संपत आहे. मुदत संपल्यानंतरही जर एखादा पाकिस्तानी नागरिक भारतात सापडला, तर त्याला तुरुंगवासाची शिक्षा होईल आणि दंडही आकारला जाईल.

काय आहेशिक्षा ?

केंद्र सरकारने भारतातील सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगणारी नोटीस बजावली आहे. शॉर्ट टर्म व्हिसावर भारतात आलेल्यांसाठी 27 एप्रिल 2025 आणि मेडिकल व्हिसावर आलेल्यांसाठी 29 एप्रिल 2025 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. जर कोणताही पाकिस्तानी नागरिक या मुदतीनंतरही देशात आढळला, तर त्याला अटक करून तुरुंगात डांबले जाईल. यासोबतच त्याला तीन वर्षांपर्यंतचा कारावास आणि तीन लाख रुपयांपर्यंत दंड, किंवा दोन्ही शिक्षांचा सामना करावा लागू शकतो.

DC vs RCB : विराट – कृणालच्या जोडीने RCB ला नेलं विजयापर्यत! दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेटने घरच्या मैदानावर पराभव

अमित शाह यांचे सर्व मुख्यमंत्र्यांना आदेश

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना परत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. भारत सरकारच्या निर्देशानुसार गेल्या तीन दिवसांत 509 पाकिस्तानी नागरिकांनी भारतातून प्रस्थान केले आहे. याचबरोबर, पाकिस्तानातून 14 राजनैतिक अधिकाऱ्यांसह एकूण 745 भारतीय नागरिक वाघा-अटारी सीमेवरून भारतात परतले आहेत.

काय  आहेत नियम ?

इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल, 2025 च्या कलम 23 नुसार, जर परदेशी नागरिकांनी त्यांच्या व्हिसाच्या अटींचा भंग केला, अधिक काळ भारतात मुक्काम केला किंवा प्रतिबंधित भागात प्रवेश केला, तर त्यांच्यावर तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा तीन लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानस्थित संघटनेचा संबंध असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर भारत सरकारने हे कठोर निर्देश दिले आहेत. या हल्ल्यात 26 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

Chhaava पाहिल्यानंतर विजय देवरकोंडाला कोणाला मारायची आहे कानशिलात? म्हणाला ‘मला राग येतोय…

अटारी सीमेवरून पाकिस्तानी नागरिकांची परतफेर सुरू
अटारी सीमेवरील पंजाब पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसांत 537 पाकिस्तानी नागरिक अटारी सीमेवरून पाकिस्तानात परतले आहेत. याच कालावधीत 850 भारतीय नागरिकांनी पाकिस्तानातून भारतात पुनःप्रवेश केला आहे.

दरम्यान, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत देश सोडण्याचे निर्देश दिले होते, आणि ही मुदत आज, 27 एप्रिल रोजी संपली आहे. वैद्यकीय कारणांसाठी व्हिसा घेणाऱ्यांसाठी अंतिम मुदत 29 एप्रिल निश्चित करण्यात आली आहे. 12 प्रकारांच्या व्हिसाधारकांसाठी भारत सोडण्याची अंतिम मुदत 27 एप्रिल होती, तर SAARC व्हिसाधारकांसाठी ही मुदत 26 एप्रिलला संपली आहे. दीर्घकालीन व्हिसाधारकांना मात्र या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

Web Title: India pakistan politics if pakistani citizens are found in india after the deadline direct warning from the center

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 09:32 AM

Topics:  

  • Amit Shah
  • pakistan

संबंधित बातम्या

Vice President Election: देशाचे पुढचे उपराष्ट्रपती राज्यपालांपैकी कोण? अनेक राज्यपाल आणि उपराज्यपालांनी घेतली मोदी-शाह यांची भेट
1

Vice President Election: देशाचे पुढचे उपराष्ट्रपती राज्यपालांपैकी कोण? अनेक राज्यपाल आणि उपराज्यपालांनी घेतली मोदी-शाह यांची भेट

Fake Indian Currency Case : पाकिस्तान-नेपाळशी संबंधित बनावट नोटा प्रकरणात NIAने आणखी एका आरोपीला केली अटक
2

Fake Indian Currency Case : पाकिस्तान-नेपाळशी संबंधित बनावट नोटा प्रकरणात NIAने आणखी एका आरोपीला केली अटक

Independence Day 2025 Live: लाल किल्ल्यावरून PM मोदींचे सर्वात दीर्घकाळाचे भाषण, 103 मिनिट्स बोलून पाकिस्तानला इशारा
3

Independence Day 2025 Live: लाल किल्ल्यावरून PM मोदींचे सर्वात दीर्घकाळाचे भाषण, 103 मिनिट्स बोलून पाकिस्तानला इशारा

‘तोंड सांभाळा, अन्यथा परिणाम वेदनादायक असतील; पाकिस्तानच्या भडकाऊ वक्तव्याला भारताचे सडेतोड उत्तर
4

‘तोंड सांभाळा, अन्यथा परिणाम वेदनादायक असतील; पाकिस्तानच्या भडकाऊ वक्तव्याला भारताचे सडेतोड उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.