फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्याचा अहवाल : आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने 6 विकेट्सने पराभव केला आहे. आजच्या दिल्लीच्या संघाची निराशाजनक कामगिरी राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने पहिले फलंदाजी करत १६२ धावा केल्या होत्या. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघासाठी विराट कोहली आणि कृणाल पंड्या यांनी संघासाठी चांगली फलंदाजी केली. दोघांनीही आज चांगली भागीदारी केली आणि अर्धशतक झळकावले. आजच्या सामन्यात दोन्ही संघानी कशी कामगिरी केली यावर एकदा नजर टाका.
आजच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाजीवर नजर टाकली तर जेकब बेथेल याला संघामध्ये आज फिल्ल सॉल्ट यांच्या जागेवर स्थान मिळाले होते पण तो संघासाठी मोठी कामगिरी करू शकला नाही. आजच्या सामन्यात विराट कोहली आणि कृणाल पंड्या या दोघांनी आज प्रभावशाली फलंदाजी केली आणि संघाला विजयापर्यत नेले. आजच्या विराट कोहलीने संघासाठी ४७ चेंडूंमध्ये ५१ धावा केल्या. त्याचबरोबर कृणाल पंड्याने आजच्या सामन्यात धुव्वादार फलंदाजी केली त्यांचबरोबर त्याने गोलंदाजीमध्ये देखील १ विकेट घेतला. कृणाल पंड्याने आज ४७ चेंडूंमध्ये आज ७३ धावा केल्या. यामध्ये त्याने ४ षटकार आणि ५ चौकार मारले.
Match 46. Royal Challengers Bengaluru Won by 6 Wicket(s) https://t.co/9M3N5Ws7Hm #DCvRCB #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2025
पाटीदार रन आऊट झाला तो मोठी कामगिरी करू शकला नाही. शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना टीम डेव्हिड फलंदाजीला आला आणि त्याने मोठे शॉट मारले. टीम डेव्हिड याने ५ चेंडूंमध्ये १९ धावा केल्या यामध्ये त्याने १ षटकार आणि ३ चौकर मारले. या विजयासह आरसीबीचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर गेला आहे. आता आरसीबीचे १४ गुण झाले आहेत.
MI vs LSG : वानखेडेवर आज लखनऊला कमबॅक करण्याची संधी! LSG ने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय
दिल्लीच्या गोलंदाजीची सांगायचे झाले तर दुसऱ्या डावात दिल्लीच्या हाती फक्त ४ विकेट लागले. यामध्ये अक्षर पटेलने संघासाठी पॉवर प्लेने दोन विकेट घेतले होते. त्यानंतर दुष्मंथा चामीरा याने संघासाठी १ विकेट घेतला. त्याबरोबर १ रनआऊट करुण नायर याने केले. बंगळुरूच्या गोलंदाजांनी आज कमालीचा खेळ पहिल्या डावांमध्ये दाखवला. यामध्ये जोश हेझलवूड याने संघासाठी २ विकेट्स घेतले. भुवनेश्वर कुमार याने संघासाठी ३ विकेट्सची कमाई केली. यश दयाल आणि कृणाल पंड्या याने प्रत्येकी १ विकेट घेतला.
दिल्लीच्या फलंदाज आज विशेष कामगिरी करू शकले नाही ट्रिस्टन स्टब्स याने संघासाठी ३४ धावा केल्या ही दिल्लीची सर्वाधिक धावसंख्या होती, इतर खेळाडू विशेष कामगिरी करू शकले नाही.