Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ethanol: पेट्रोलनंतर आता स्वयंपाकघरात इथेनॉलची एंट्री! इंधन क्षेत्रात सुरू होणार नवे पर्व

Ethanol : देशात स्वच्छ आणि स्वस्त इंधनाचा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकार एका नव्या पर्यायावर काम करत आहे. भविष्यात स्वयंपाकासाठी फक्त LPG सिलिंडरवर अवलंबून राहावे लागणार नाही. त्याऐवजी इथेनॉलचा वापर करण्याचा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. यासाठी केंद्र स्तरावर नियोजन सुरू असून, धोरण अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर आली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 20, 2026 | 12:01 PM
Ethanol Gas (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Ethanol Gas (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • एलपीजीवरील ताण लवकरच कमी
  • इथेनॉलचा वापर घरगुती स्वयंपाकासाठी होऊ शकतो. 
  • मोठ्या प्रमाणात इथेनॉल उपलब्ध
 

गेल्या काही वर्षांत वाहनांसाठी पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर वाढवण्यात आला. आता त्याच इंधनाचा उपयोग घरगुती स्वयंपाकासाठी करण्याचा विचार सुरू आहे. या निर्णयामुळे आयात होणाऱ्या एलपीजीवरील ताण कमी होऊ शकतो. तसेच देशाच्या ऊर्जा गरजांमध्येही मोठा बदल घडू शकतो.

सरकारकडून ‘या’ योजनेसाठी विशेष प्रोत्साहन

मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोलियम मंत्रालय इथेनॉलला(Ethanol)  घरगुती इंधन म्हणून मान्यता देण्यासाठी आवश्यक नियम आणि सुविधा तयार करत आहे. यामध्ये इथेनॉलचा पुरवठा, वितरण व्यवस्था आणि ग्राहकांना मदत मिळावी यासाठी आर्थिक सवलतींचाही विचार केला जात आहे. सरकारकडून या योजनेसाठी विशेष प्रोत्साहन दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इथेनॉलवर चालणाऱ्या स्वयंपाकाच्या चुलींची चाचणी सुरु..

या धोरणाचा आराखडा सप्टेंबरपर्यंत तयार होऊ शकतो. त्यानंतर चाचण्या आणि आवश्यक मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये इथेनॉलवर चालणाऱ्या स्वयंपाकाच्या चुलींची चाचणीही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

इथेनॉल कोणत्या पिकांच्या धान्यांपासून तयार होते?

इथेनॉल हे ऊस, मका आणि इतर धान्यांपासून तयार होणारे जैवइंधन आहे. यामुळे धूर कमी निर्माण होतो आणि पर्यावरणावरही कमी परिणाम होतो. याशिवाय देशात त्याचे उत्पादन सातत्याने वाढत असल्याने भविष्यात त्याचा अधिक प्रभावी वापर करण्यावर भर दिला जात आहे.

मोठ्या प्रमाणात इथेनॉल उपलब्ध

सध्या भारतात इथेनॉलचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. वाहनांसाठी इंधन मिश्रणात वापर झाल्यानंतरही मोठ्या प्रमाणात इथेनॉल उपलब्ध राहत असल्याचे उद्योग क्षेत्राचे मत आहे. त्यामुळे ही अतिरिक्त क्षमता घरगुती वापरासाठी वळवण्याचा विचार सरकार करत आहे. यामुळे उत्पादकांनाही नवी बाजारपेठ मिळू शकते.

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! भारत गॅसने आणला हलका सिलेंडर, आता होणार …

कोणत्या योजनेमुळे परदेशात एलपीजी दर कमी?

या योजनेचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे परदेशातून आयात होणाऱ्या एलपीजीवरील खर्च कमी होऊ शकतो. भारत अजूनही स्वयंपाकाच्या गॅससाठी मोठ्या प्रमाणात परदेशावर अवलंबून आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती बदलली किंवा पुरवठ्यात अडथळे आले तर त्याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारावर होतो. अशा वेळी इथेनॉलसारखा पर्याय उपयुक्त ठरू शकतो.

पेट्रोल पंपांवर विशेष इथेनॉल वितरण केंद्र उभारणार

योजनेअंतर्गत तेल कंपन्यांनाही महत्त्वाची भूमिका दिली जाऊ शकते. पेट्रोल पंपांवर विशेष इथेनॉल वितरण केंद्र उभारण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे. ग्राहकांना छोट्या कॅनमध्ये किंवा विशेष कंटेनरमध्ये इथेनॉल सहज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था तयार केली जाऊ शकते. त्यामुळे इंधन भरण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल.

देशात ऊर्जा सुरक्षेला बळकटी

तज्ज्ञांच्या मते, स्वच्छ इंधनाचा वापर वाढल्यास पर्यावरणालाही फायदा होईल. त्याचबरोबर एलपीजी अनुदानाचा भारही भविष्यात कमी होण्याची शक्यता आहे. देशात ऊर्जा सुरक्षेला बळकटी देण्यासाठी आणि स्थानिक उत्पादनाचा अधिक वापर करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो.

CJP Parliament March LIVE:  लाठीचार्जाच्या आरोपांवर दिल्ली पोलिसांचे स्पष्टीकरण

भारतीय घरांमध्ये स्वयंपाकासाठी इथेनॉल हा नवा पर्याय

सध्या या योजनेबाबत अंतिम निर्णय झालेला नसला तरी सरकारची तयारी वेगाने सुरू आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारतीय घरांमध्ये स्वयंपाकासाठी इथेनॉल हा नवा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे स्वच्छ इंधन, कमी खर्च आणि ऊर्जा स्वावलंबन या तिन्ही गोष्टी साध्य करण्याच्या दिशेने भारत आणखी एक मोठे पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे.

Web Title: India plans ethanol based cooking stoves for households

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • Ethanol Petrol
  • LPG Gas

संबंधित बातम्या

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! भारत गॅसने आणला हलका सिलेंडर, आता होणार फास्ट डिलिव्हरी; तात्काळ कनेक्शनसाठी ‘हे’ करा
1

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! भारत गॅसने आणला हलका सिलेंडर, आता होणार फास्ट डिलिव्हरी; तात्काळ कनेक्शनसाठी ‘हे’ करा

LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! सिलिंडरमध्ये शिल्लक राहणाऱ्या गॅसवर निघाला तोडगा; वाचतील ₹21900 कोटी रुपये
2

LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! सिलिंडरमध्ये शिल्लक राहणाऱ्या गॅसवर निघाला तोडगा; वाचतील ₹21900 कोटी रुपये

E20 वर मान्सूनचं संकट! पावसाच्या ओलाव्यामुळे एथेनॉल – पेट्रोल होतंय वेगळं? पेट्रोल पंप असोसिएशनने दिला गंभीर इशारा?
3

E20 वर मान्सूनचं संकट! पावसाच्या ओलाव्यामुळे एथेनॉल – पेट्रोल होतंय वेगळं? पेट्रोल पंप असोसिएशनने दिला गंभीर इशारा?

Kitchen Utensils Expiry Date : स्वयंपाकघरातील भांडी आरोग्यासाठी ठरु शकतात धोकादायक! आजार टाळायचे असतील तर ही चिन्हे वेळीच ओळखा
4

Kitchen Utensils Expiry Date : स्वयंपाकघरातील भांडी आरोग्यासाठी ठरु शकतात धोकादायक! आजार टाळायचे असतील तर ही चिन्हे वेळीच ओळखा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.