Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Army: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घुसल्याची शक्यता; नियंत्रण रेषेजवळ लष्कराकडून सर्च ऑपरेशन

नियंत्रण रेषेजवळ काही दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला प्राप्त झाली. त्यानंतर लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 12, 2025 | 05:24 PM
Indian Army: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घुसल्याची शक्यता; नियंत्रण रेषेजवळ लष्कराकडून सर्च ऑपरेशन

Indian Army: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घुसल्याची शक्यता; नियंत्रण रेषेजवळ लष्कराकडून सर्च ऑपरेशन

Follow Us
Follow Us:

श्रीनगर: शेजारील राष्ट्र पाकिस्तान कायमच भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत असतो. मात्र भारतीय लष्कर अशा नापाक कारवायांना सडेतोड उत्तर देत असते. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. मात्र याच दरम्यान काही महत्वाची माहिती समोर येत आहे. भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरच्या आखनूर सेक्टरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. या भागात काही दशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानुसार हे सर्च ऑपरेशन केले जात आहे.

नियंत्रण रेषेजवळ काही दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला प्राप्त झाली. त्यानंतर लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली आहे. तसेच जोगीवन वनक्षेत्रात संशयास्पद हालचाली देखील आढळून आल्या आहेत. त्यामुळे भट्टल परिसरात लष्कराच्या अनेक तुकड्या शोध मोहीम राबवत आहे. या भागात काही दहशतवादी घुसल्याचा संशय भारतीय लष्कराला आहे.

शोधमोहीम अधिक वेगाने सुरू

भारतीय लष्कर या भागात अत्यंत वेगाने आणि सावधगिरीने शोध मोहीम राबवत आहे. त्यामुळे या परीसरासह संवेनदशील भागात भारतीय लष्कराने सुरक्षा वाढवली आहे. सैनिकांची संख्या वाढवण्यात आली आहे. सध्यातरी कोणतीही संशयास्पद कृती लष्कराला आढळून आलेली नाही. मात्र सतर्कता पूर्ण बाळगली जात आहे. श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले आहे. मागील वर्षी याच परिसरात लष्कराने दोन ते तीन दहशतवादी ठार केले होते.

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या १५ तासात ३ दहशतवाद्यांना कठस्नान घालण्यात आलं आहे. एकीकडे सुरक्षादलांसोबत सोपोरमध्ये एका दहशतवादीला ठार करण्यात आलं असतानाच, किश्तवाडमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. तर ४ जवान जखमी झाले आहेत. सुरक्षादलांना अनेक ठिकाणी नाकाबंदी केली असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Web Title: Indian army search operation at akhnoor sector jammu kashmir finding terrorist latets news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 05:24 PM

Topics:  

  • indian army
  • jammu kashmir

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या बडगाम येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक; ‘लष्कर-ए-तोयबा’चा मुख्य कमांडर ठार
1

जम्मू-काश्मीरच्या बडगाम येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक; ‘लष्कर-ए-तोयबा’चा मुख्य कमांडर ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.