
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या वाहनाला अपघात
10 जवान शहिद तर 7 जखमी
जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील घटना
जम्मू काश्मीर राज्यातून एक अत्यंत दु: खद घटना समोर येत आहे. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाला अपघात झाला आहे. जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात लष्कराच्या वाहनाला अपघात झाला आहे. लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळले आहे. या भीषण घटनेत भारतीय लष्कराचे 10 जवान शहीद झाल्याचे समोर येत आहे. तसेच 7 जवान जखमी झाल्याचे समजते आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
समोर आलेल्या महितीनुसार, एका बुलेटप्रूफ गाडीतून लष्कराचे 17 जवान प्रवास करत होते. ट्रकच्या माध्यमातून ते एका उंचवरील पोस्टकडे जात होते. एका ठिकाणी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्यांचे वाहन 200 फुट खोल दरीत कोसळले. या घटनेची माहिती मिळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Deeply saddened at the loss of lives of 10 of our brave Indian Army soldiers in an unfortunate road accident in Doda. We will always remember the outstanding service and supreme sacrifice of our brave soldiers. My deepest condolences to the grieving families. — Office of LG J&K (@OfficeOfLGJandK) January 22, 2026
घटनेची माहिती प्राप्त होताच त्या ठिकाणी जम्मू काश्मीर पोलिस आणि आर्मीने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. या घटनेत 10 जवान शहीद झाले आहेत. तर 7 जवान जखमी झाले आहेत. काहींची प्रकृती गंभीर असून त्यांना उधमपुर येथे लष्कराच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उपराज्यपाल यांनी व्यक्त केला शोक
लष्कराच्या वाहनाच्या झालेल्या अपघातावर उपराज्यपाल यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘डोडा येथे एका दु:खद एका दुर्घटनेत भारताचे 10 शूर जवान शहीद झाले आहेत. आपल्या शूर सैनिकांच्या उत्कृष्ट सेवेचे आणि सर्वोच्च बलिदानाचे आपण नेहमीच स्मरण करू. शोकाकुल कुटुंबांना माझ्या मनापासून संवेदना. जखमी झालेल्या सैनिकांना एअरलिफ्ट करून उधमपुर येथील लष्कराच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. दरम्यान भारतीय लष्कराने या घटनेचा तपास सुरू केला आहे.