
IndiGo Cancels Over 550 Flights Amid New Pilot Rest Rules IndiGo shares fall losses of crores
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असेलल्या इंडिगोची अनेक प्रवासी प्राधान्य देतात. मात्र इंडिगो कंपनीला पायलट आणि क्रू मेंबर्सची कमतरता भासत आहे. यामुळे एअरलाइनला संपूर्ण देशात 200 हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. या निर्णयामुळे कंपनीला शेअर बाजारात मोठा फटका बसला आहे. कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कंपनीच्या नावाची बदनामी देखील झाली आहे. यामुळे इंडिगो कंपनीला कोट्यवधी रुपयांची नुकसान सहन करावे लागले.
हे देखील वाचा : Indigo च्या 550 पेक्षा अधिक फ्लाईट्स रद्द, देशभरातील एअरपोर्ट्सवर गोंधळ; 12 तास अन्नपाण्याशिवाय अडकले प्रवासी
इंडिगो कंपनीचे नोव्हेंबरमध्ये झालेल्या या सावळ्या गोंधळामुळे कंपनीला शेअर बाजारात मोठा प्रमाणात फटका बसला आहे. कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले, ज्यामुळे तिचे मूल्यांकन 7160 कोटींनी कमी झाले. यामुळे कंपनीच्या मुल्यावर मोठा परिणाम झाला. फाईट रद्द होत असल्यामुळे एअरलाइनच्या समस्या आणखी वाढल्या आहेत, ज्यामुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) हस्तक्षेप करून या प्रकरणावर एअरलाइनकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
Indigoच्या शेअर्समध्ये मोठी घसरण
बीएसईच्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या इंडिगोच्या शेअर्समध्ये लक्षणीय घसरण दिसून आली. ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीचा शेअर 3.30 टक्क्यांनी घसरला आणि तो 5407.30 च्या नीचांकी पातळीवर पोहोचला. कंपनीचा शेअर आदल्या दिवशी 5592.50 वर व्यवहार करत होता. दुपारी 3 वाजता कंपनीचा शेअर 5428 वर व्यवहार करत होता, जो जवळजवळ 3 टक्क्यांनी घसरला. सकाळी कंपनीचा शेअर 5499 वर उघडला होता. 18 ऑगस्ट रोजी कंपनीचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी 6225 वर पोहोचला. तेव्हापासून, त्यात 13 टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली आहे.
हे देखील वाचा : फॅशन विश्वात राज्य करणाऱ्या मनिष मल्होत्राचा वाढदिवस; जाणून घ्या 05 डिसेंबरचा इतिहास
कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यामुळे, इंडिगोच्या मूल्यांकनातही लक्षणीय घट झाली आहे. गुरुवारी व्यवहार बंद होताना कंपनीचे बाजार भांडवल 216200.51 कोटी रुपये होते, ते गुरुवारी व्यवहार सत्रात 209040.86 कोटी रुपयांवर घसरले. याचा अर्थ व्यवहार सत्रात कंपनीला 7160 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. तज्ञांचा असा विश्वास आहे की जोपर्यंत विमान कंपनीच्या कामकाजात सुधारणा होत नाही तोपर्यंत तिच्या शेअर्सवर अशा पद्धतीची घसरण दिसू शकते.