
Indigo Crisis : रद्द झालेल्या हजारो उड्डाणांचा अखेर निकाल; प्रवाशांना आज मिळणार इंडिगोच्या तिकिटांचा परतावा!
शनिवारी ४०० हून अधिक उड्डाणे रद्द
५ डिसेंबरला देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोच्या १,००० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यानंतर शनिवारी ६ डिसेंबरला ही हीच परिस्थिती कायम राहिली. शनिवारी, देशातील चार प्रमुख विमानतळांसह दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि बेंगळुरू येथील अनेक शहरांमधील विमानतळांवर ४०० हून अधिक उढाणे रद्द करण्यात आली. परताव्याच्या प्रक्रियेत कोणताही विलंब किंवा पालन न केल्यास तात्काळ नियामक कारवाई केली जाईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
इंडिगोचे अधिकृत धोरण काय?
इंडिगोच्या अ धिकृत धोरणानुसार, जर उड्डाण रद्द झाले, प्रस्थान वेळ एक तास किंवा त्यापेक्षा जास्त पुढे ढकलली गेली किवा दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाला, तर प्रवाशांना मोफत तारीख वेळ बदलता येईल किंवा पूर्ण पैसे परत मिळतील. ‘प्लॅन बी’ हा ऑनलाइन पर्याय वापरून प्रवासी स्वतः दुसरे उड्डाण निवडू शकतात किंवा परतफेड प्रक्रिया करू शकतात. ट्रॅव्हल एजंटकडून बुकिंग केले असेल व त्या एजंटशी संपर्क साधावा लागतो. डीजीसीएच नियमानुसार, जर विमान कंपनीने प्रस्थानाच किमान दोन आठवड्यांआधी उड्डाण रद्द झाल्या पूर्वसूचना दिली नाही किंवा कनेक्टि फ्लाइट चुकली, तर प्रवाशांना भरपा मिळण्याचा अधिकार आहे.