(फोटो सौजन्य – Instagram)
व्हिडिओत काय घडलं?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अनेक प्रवासी एअरपोर्टच्या काऊंटरसमोर उभे असल्याचा दिसून येते. काहीजण शांततेत तक्रार करत असतात तर एक आफ्रिकन महिला यावेळी रागातच कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर जबरदस्त भडकताना दिसून आली. ती हातवारे करत त्यांना खरी-खोटी सुनावू लागते. एवढंच काय तर पुढे महिला काऊंटर उभी राहून राडा घालतानाही दिसून आली. व्हायरल व्हिडिओमध्ये एक आफ्रिकन महिला इंडिगोच्या कर्मचाऱ्यांकडून तिची फ्लाइट अचानक रद्द झाल्यानंतर उत्तरे मागत असल्याचे दाखवले आहे. जेव्हा तिला प्रतिसाद मिळत नाही तेव्हा ती आणखीन भडकते, काउंटरवर चढते आणि एअरलाइनच्या गैरव्यवस्थापनाबद्दल ओरडून ओरडून तिथे जमाव गोळा करते. हा सर्वच प्रकार इंडीगोच्या चुकीच्या व्यवस्थापनाचा परिणाम असून कंपनीला यामुळे मोठ्या लाजेला सामोरे जावे लागत आहे.
साप एकनिष्ठ आहे! बाईचं पकडणं सापाला आवडेना, हातात पकडताच घेतला गालाचा चावा… थरारक Video Viral
एअरपोर्टवर उपस्थित असलेल्या लोकांनी हा सर्व प्रकार आपल्या डोळ्यांनी पाहिला तर काहींनी हे दृश्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले. हा व्हिडिओ @vishalpatel.vj नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने लिहिले आहे की, “मुळात तिचे विमान तिकीट रद्द झाले होते आणि कंपनीला हे सर्व काही सांभाळता आले नाही. ती आता भुकेली आहे आणि तिला झोपायला जागा नाही. तिला फ्रान्सला परत जायचे आहे. म्हणूनच ती ओरडत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जेवण कुणीही दिलं असतं फक्त इंग्रजीत बोलायला हवं होतं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “लोक बाहेर अडकलेले असताना त्यांना मदत करण्याऐवजी काचेच्या आतून गप्पा मारण्याची हिंमत कर्मचाऱ्यांना आहे. निर्लज्ज आणि घृणास्पद”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






