(फोटो सौजन्य – X)
पतीचे कफीन घेऊन महिला अडकली एअरपोर्टवर…
इंडिगोच्या संकटामुळे एका महिलेवर दुःखाचा डबल डोंगर कोसळताना दिसून आला. महिला शिलाँगवरून आपल्या पतीच्या मृत्यूची शवपेटी कोलकात्याला घेऊन जात होती पण वाटेतच तीही या गोंधळाला बळी पडली. आपले दुःख व्यक्त करताना महिलेने सांगितले की, “मी आज सकाळी शिलाँगहून आली. माझ्या पतीचे निधन झाले आणि मी त्यांचे शवपेटी कोलकात्याला घेऊन जाण्यासाठी आलो आहे जेणेकरून त्यांना त्यांच्या गावी दफन करता येईल. आम्ही इंडिगोची फ्लाइट बुक केली आहे आणि अजूनही फ्लाइट टेक ऑफ होईल की नाही याबद्दल कोणतीही माहिती नाही…”आसाममधील गुवाहाटी विमानतळावर अडकलेल्या एका पत्नीची ही व्यथा मनाला भिडणारी आहे. ती विचारत आहे, “या परिस्थितीत मी काय करावे?” पण याचे उत्तर अद्याप कुणाकडेही नाही.
वडिलांच्या अस्थि वाहू शकली नाही मुलगी…
आणखी एक अशीच घटना लोकांच्या मनाला भिडली ज्यात मुलगी वडिलांच्या अस्थि हातात घेऊन एअरपोर्टवर अडकल्याचे समजले. हातात एक कलश धरून आणि माध्यमांना दाखवत नमिता म्हणाली, “माझ्या वडिलांच्या अस्थी माझ्याकडे आहेत. मला बंगळुरूहून दिल्लीला जायचे व . दिल्लीहून मला हरिद्वारला पोहोचण्यासाठी डेहराडूनला विमान पकडावे लागेल. अस्थींचे विसर्जन उद्या आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता, इंडिगोने विमान रद्द केले. आता ते म्हणत आहेत की त्यांच्याकडे आज कोणतेही विमान नाही. ते आम्हाला इतर विमान कंपन्यांकडून विमान बुक करण्यास सांगत आहेत. इतर विमानांचे तिकिट भाडे प्रति व्यक्ती ६०,००० रुपये आहे, जे मला परवडत नाही… आम्ही हरिद्वारला पोहोचू शकत नाही. आमचे सर्व पैसे वाया गेले आहेत. आम्हाला एका आठवड्यात एक छोटासा परतावा मिळेल. किती कपात होईल हे आम्हाला माहित नाही.” नमिता यांनी सरकारला आवाहनही केले की, “मी सरकारला विनंती करते की मला हरिद्वारला पोहोचण्याची व्यवस्था करावी कारण माझ्या वडिलांच्या अस्थी गंगेत विसर्जन करणे खूप महत्वाचे आहे.”
इंडिगोच्या फ्लाइट रद्द झाल्यामुळे एअरपोर्टवर माजवलेला हा गोंधळ मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून आले. या लेखात आम्ही दोन कथा सांगितल्या पण इंटरनेटवर घटनेचे व्हायरल होणारे अनेक व्हिडिओज लोकांच्या दुःखाची कथा व्यक्त करते.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






