Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistani Terrorist Killed : सीमेवर पुन्हा चकमक! उरीत भारतीय जवानांनी पाकिस्तानी दहशतवाद्याला घातले कंठस्नान

भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलीस यांनी संयुक्त कारवाई करुन उरीमध्ये एका घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार मारले आहे. अजूनही सर्च ऑपरेशन सुरु आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 15, 2026 | 10:18 AM
infiltrated Pakistani terrorist killed by Indian soldiers from Uri JK news

infiltrated Pakistani terrorist killed by Indian soldiers from Uri JK news

Follow Us
Follow Us:
  • जम्मू -काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवादी ठार
  • उरीमधून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न
  • भारतीय जवानांंनी एका दहशतवाद्याला केले ठार
Uri Pakistani Terrorist Killed : जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत एका पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार (Terrorist killed) मारण्यात आले आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील बुछार भागात ही कारवाई करण्यात आली. भारतीय लष्कराच्या म्हणण्यानुसार, जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) पोलिसांकडून मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, १४ आणि १५ मार्चच्या रात्री घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली. या कारवाईदरम्यान, घनदाट जंगलात एका संशयित दहशतवाद्याच्या हालचाली दिसून आल्या.

त्यानंतर लष्कराने परिसराला वेढा घातला आणि दहशतवाद्याला आत्मसमर्पण करण्याचे आव्हान दिले. तथापि, दहशतवाद्याने प्रत्युत्तरात अंदाधुंद गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले, ज्यामध्ये दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : नाशिक-सिन्नर महामार्गावर ‘बर्निंग बस’चा थरार; बसमधून अचानक धूर निघू लागला अन् नंतर…

भारतीय लष्कराने म्हटले आहे की, “जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी घुसखोरीच्या प्रयत्नाबाबत दिलेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, १४-१५ मार्च २०२६ च्या मध्यरात्री उरी सेक्टरच्या बुछार भागात संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली. जवानांना झुडुपात एका दहशतवाद्याच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. हल्ल्याची रणनीती बदलण्यात आली आणि दहशतवाद्याला आव्हान देण्यात आले, परिणामी दहशतवाद्याने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. चकमकीत एक पाकिस्तानी दहशतवादी ठार झाला. एके रायफल, एक पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला. ही कारवाई सुरू आहे.”

हे देखील वाचा : सांगलीत ‘ऑपरेशन लोटस’ टाळण्यासाठी आघाडीने केली ‘अशी’ खेळी; जिल्हा परिषदेच्या 36 सदस्यांना थेट…

सुरक्षा दलांशी चकमक

सुरक्षा दलांनी घुसखोरी रोखण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे दशवतवादी आणि भारतीय सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक सुरू झाली. या कारवाईदरम्यान एक संशयित दहशतवादी ठार झाला. दुसऱ्या दहशतवाद्याला शोधण्यासाठी परिसरात शोध मोहीम सुरू आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, इतर कोणतेही घुसखोर लपून बसले नाहीत याची खात्री करण्यासाठी सुरक्षा दल संपूर्ण परिसरात शोध घेत आहेत. चकमकीच्या ठिकाणाहून एके रायफल, एक पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. तेथे आणखी काही दहशतवादी लपले आहेत का हे शोधण्यासाठी सध्या संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू आहे.

Web Title: Infiltrated pakistani terrorist killed by indian soldiers from uri jk news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • indian army
  • jammu kashmir
  • terrorist killed

संबंधित बातम्या

Indian Aarmy : भारतीय सैन्याच्या प्रशिक्षित श्वानांचा धडकी भरवणारा युद्ध अभ्यास; श्वानांचे कौशल्य पाहून अमेरिकन सैन्य थक्क!
1

Indian Aarmy : भारतीय सैन्याच्या प्रशिक्षित श्वानांचा धडकी भरवणारा युद्ध अभ्यास; श्वानांचे कौशल्य पाहून अमेरिकन सैन्य थक्क!

तब्बल 19000 अग्निवीर होणार सेवानिवृत्त; 31 डिसेंबरला पहिली सरकारी नोकरी संपणार
2

तब्बल 19000 अग्निवीर होणार सेवानिवृत्त; 31 डिसेंबरला पहिली सरकारी नोकरी संपणार

Indian Army News: कारगिलच्या लेकीने रचला इतिहास! जाणून घ्या पहिल्या महिला लष्करी अधिकारी स्टँझिन यांचा प्रवास
3

Indian Army News: कारगिलच्या लेकीने रचला इतिहास! जाणून घ्या पहिल्या महिला लष्करी अधिकारी स्टँझिन यांचा प्रवास

Rishabh Sambyal Resign: अवघ्या ३० व्या वर्षी मेजर ऋषभ संब्याल निवृत्त! पेन्शन मिळणार की नाही? वाचा लष्कराचा नियम
4

Rishabh Sambyal Resign: अवघ्या ३० व्या वर्षी मेजर ऋषभ संब्याल निवृत्त! पेन्शन मिळणार की नाही? वाचा लष्कराचा नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.