Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐन सणासुदीच्या काळात महागाईचा फटका; डाळ, साखर, मैदा, रव्याचे वाढले दर

सणासुदीच्या काळात साहित्याचे वाढलेले भाव घरखर्चावर ताण आणत आहेत. सण हे संस्कृतीचा भाग असल्याने हवे नकोतेही खर्च करावे लागतात आणि त्यामुळे उत्पन्न खर्चातील समतोल बिघडतो.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 23, 2025 | 09:54 AM
ऐन सणासुदीच्या काळात महागाईचा फटका; डाळ, साखर, मैदा, रव्याचे दर वाढले

ऐन सणासुदीच्या काळात महागाईचा फटका; डाळ, साखर, मैदा, रव्याचे दर वाढले

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : सणासुदीच्या दिवसांत डाळ, हरभरा, साखर, मसाले आणि भाजीपाला यांना अधिक मागणी असते. परंतु, यंदा हरभरा डाळ व तूर डाळ यांचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. खाद्यतेल, डाळ, साखर, मैदा आणि रव्याच्या दरातही तब्बल १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे घरखर्चाचा तोल बिघडत असून, ऐन सणासुदीच्या काळात महागाईचा फटका बसणार आहे.

सणांच्या दिवसांत मैदा, रवा आणि गोडधोडासाठी लागणाऱ्या इतर साहित्याची मागणी वाढते. या मागणीचा थेट परिणाम दरवाढीवर झाला आहे. विशेषतः गोडधोड आणि पंचपक्वान्नांची रेलचेल असलेल्या सणासुदीच्या काळात साहित्याचे वाढलेले भाव घरखर्चावर ताण आणत आहेत. सण हे संस्कृतीचा भाग असल्याने हवे नकोतेही खर्च करावे लागतात आणि त्यामुळे उत्पन्न खर्चातील समतोल बिघडतो. सामान्य कुटुंबांची डाळ शिजेनाशी झाली आहे. सणावारांच्या तोंडावर वाढलेल्या मागणीमुळे हरभरा, तूर आणि मसूर डाळींच्या भावात मोठी वाढ झाली आहे.

दरम्यान, रेशनमधून मिळणाऱ्या डाळ, साखर, रवा, तेल या ‘आनंदाच्या शिधा’ने सामान्यांना दिलासा मिळत होता. मात्र, आता तो शिधा बंद झाल्याने नागरिकांना मोकळ्या बाजारपेठेतूनच वाढीव दराने खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे महागाईची झळ थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात जाणवत आहे. या काळात गोडधोडाची मजा घेण्याची इच्छा असली तरी जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे अनेक कुटुंबांना बजेटमध्ये फेरबदल लागणार आहे.

हरभरा, बेसनसह अनेक गोष्टी महागणार

गौरी-गणपती, नवरात्र आणि दिवाळीपर्यंत हरभरा व बेसन डाळीला मोठी मागणी राहणार असून त्याचा परिणाम भावांवर होणार आहे. महागाईची झळ थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात जाणवत आहे.

अन्नधान्याच्या किमती झाल्या होत्या कमी

जुलै महिन्यात अन्नधान्याच्या किमती कमी झाल्या होत्या. तेव्हा भारतातील महागाई आणखी मंदावली होती. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या मते, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वर आधारित किरकोळ महागाई दर जुलैमध्ये आठ वर्षांच्या नीचांकी १.५५% वर घसरल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Inflation increases during festive season

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 09:54 AM

Topics:  

  • Festival News
  • Festive Season
  • Inflation Increases

संबंधित बातम्या

FeteDeLaMusique: फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवाचे रूपांतर थरारक भयकथेत; महिलांवर सिरिंज हल्ले, अत्याचाराचे भीषण सत्र
1

FeteDeLaMusique: फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवाचे रूपांतर थरारक भयकथेत; महिलांवर सिरिंज हल्ले, अत्याचाराचे भीषण सत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.