Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-Israel War: इराणने मागितली भारताकडे मदत; एस. जयशंकर आणि सैय्यद अराघचींमध्ये नेमकी काय झाली चर्चा?

एस. जयशंकर आणि अराघची यांनी आज (13 मार्च) फोनवरून चर्चा केली. या संभाषणादरम्यान, दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 13, 2026 | 04:05 PM
Iran Seeks India’s Support Amid War with USA; S. Jaishankar Holds High-Level Talks

Iran Seeks India’s Support Amid War with USA; S. Jaishankar Holds High-Level Talks

Follow Us
Close
Follow Us:
  • युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने भारताकडे मदत मागितल्याची माहिती
  • एस. जयशंकर यांनी गेल्या काही दिवसांत इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांशी तब्बल तीन वेळा चर्चा
  • भारताने प्रादेशिक स्थिरता आणि शांततेवर भर दिला असून, इराणमधील भारतीयांची सुरक्षा आणि अखंड ऊर्जा पुरवठा ही भारताची प्राथमिकता
 

 US-Israel Iran War : इराण आणि अमेरिकेतील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. युद्धाचा आजचा १४ वा दिवस असून अमेरिकेकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये तणाव शिगेला पोहचला आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने भारताकडे मदत मागितल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणचे परराष्ट्र मंत्री सैय्यद अब्बास अराघची आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यात फोनवरून सध्याच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर उच्चस्तरीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

एस. जयशंकर आणि अराघची यांनी आज (13 मार्च) फोनवरून चर्चा केली. या संभाषणादरम्यान, दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांबाबतची नुकत्याच झालेल्या हल्ल्यांची माहिती दिली. तसेच इराणला स्वतःच्या सुरक्षेसाठी बदला घेण्याचा अधिकार आहे. अराघची यांनी आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटनांना इराणवरील लष्करी हल्ल्यांचा निषेध करण्याचे आवाहनही केले.

Middle East War: ‘खामेनेई परत आले?’ इराणच्या ‘त्या’ AI व्हिडिओने अमेरिकेचे धाबे दणाणले; सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल!

अराघची यांनी सांगितले की, ब्रिक्ससारखे व्यासपीठ सध्याच्या परिस्थितीत महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्यांनी प्रदेश आणि जगात स्थिरता आणि सुरक्षा राखण्यात रचनात्मक भूमिका बजावली पाहिजे. अराघची यांच्या भूमिकेवर बोलताना एस. जयशंकर म्हणाले की, भारत प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्य वाढवण्यास तयार आहे. इराणमधील शाश्वत शांतता आणि स्थिरता ही सर्व देशांची सामान्य गरज असल्याचे वर्णन केले.

मध्य पूर्वेतील बिघडत चाललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकार आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गेल्या काही दिवसांत इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांच्याशी तब्बल तीन वेळा चर्चा केली असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या चर्चेत प्रामुख्याने काही महत्त्वाच्या विषयांवर भर देण्यात आला. यामध्ये युद्धाच्या स्थितीत भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होऊ नये, यावर चर्चा झाली. व्यापारी जहाजांच्या सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर दोन्ही नेत्यांनी संवाद साधला. तसेच, इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

War Update: इराणचा अजेय किल्ला! मोहम्मद अली जाफरी यांची ‘Mosaic Defense System’ एक घातक चक्रव्यूह; ज्यात अडकलं अमेरिकन सैन्य

भारतीयांसाठी मदतीचा हात:

सरकार केवळ राजनैतिक पातळीवरच नाही, तर जमिनीवरही मदत कार्य राबवत आहे. इराणमधून मायदेशी परतू इच्छिणाऱ्या भारतीयांना अझरबैजान आणि आर्मेनिया मार्गे येण्यासाठी व्हिसा मिळवून दिला जात आहे. जमिनीवरील सीमा ओलांडून सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी भारतीय दूतावास सक्रिय मदत करत आहे. प्रवक्ते जयस्वाल म्हणाले की, सध्या परिस्थितीवर बारीक लक्ष असून भारतीय नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

इराणमध्ये किती भारतीय आहेत?

युद्धाच्या परिस्थिती सध्या ९,००० भारतीय नागरिक इराणमध्ये असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थी, खलाशी, व्यापारी, व्यावसायिक आणि काही यात्रेकरूंचा समावेश आहे.

 

 

Web Title: Iran seeks indias support amid war with usa s jaishankar holds high level talks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • Iran-Israel War
  • S. Jaishankar
  • World War 3

संबंधित बातम्या

BRICS 2026 Summit : ब्रिक्स परिषदेत भारताचा दबदबा! Jaishankar यांच्या चार सूत्री अजेंडाची सर्वत्र चर्चा, वाचा सविस्तर
1

BRICS 2026 Summit : ब्रिक्स परिषदेत भारताचा दबदबा! Jaishankar यांच्या चार सूत्री अजेंडाची सर्वत्र चर्चा, वाचा सविस्तर

Gaza Blockade Break: डझनभर जहाजे निघाली गाझाच्या दिशेने! इस्रायली नाकेबंदीला आव्हान देण्याच्या तयारीत, नेमकं काय घडणार?
2

Gaza Blockade Break: डझनभर जहाजे निघाली गाझाच्या दिशेने! इस्रायली नाकेबंदीला आव्हान देण्याच्या तयारीत, नेमकं काय घडणार?

S Jaishankar : विज्ञानातील ‘ऐतिहासिक विकृती’ आता संपणार! परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी न्यूयॉर्कमध्ये मांडली परखड भूमिका
3

S Jaishankar : विज्ञानातील ‘ऐतिहासिक विकृती’ आता संपणार! परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी न्यूयॉर्कमध्ये मांडली परखड भूमिका

Dirty Bomb: युद्धाचा नवा आणि सर्वात धोकादायक अंक; इराणचा ‘डर्टी बॉम्ब’ प्लॅन काय? 440 किलो युरेनियम आणि अमेरिकेची लष्करी तयारी
4

Dirty Bomb: युद्धाचा नवा आणि सर्वात धोकादायक अंक; इराणचा ‘डर्टी बॉम्ब’ प्लॅन काय? 440 किलो युरेनियम आणि अमेरिकेची लष्करी तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.